आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड – 19: मिथक आणि तथ्य


भारतीय निवडणूक आयोगासमवेत 6 जानेवारी 2022 ला झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या टिपण्णीबाबत माध्यमातून आलेली वृत्त तथ्यहीन आणि दिशाभूल करणारी

निवडणुका होणाऱ्या 5 राज्यातला कोविड संसर्ग आणि लसीकरण स्थिती याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतीय निवडणूक आयोगाला दिली माहिती

Posted On: 07 JAN 2022 2:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जानेवारी 2022

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, भारतीय निवडणूक आयोगासमवेत काल झालेल्या बैठकीत, ‘देशातल्या कोविड स्थिती बाबत चिंता करण्याजोगी स्थिती नाही’ आणि ज्या राज्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत अशा राज्यात ओमिक्रोनचे अतिशय कमी रुग्ण असल्याने चिंताजनक परिस्थिती नाही’ असे सुचवल्याचे काही माध्यमांच्या वृत्तातून सूचित करण्यात आले आहे. अशी वृत्ते पूर्णतः दिशाभूल करणारी आणि सत्याचा अपलाप करणारी आहेत. महामारीच्या काळात दिशाभूल करणारी माहिती देणारी मोहीम सुरु करण्याची प्रवृत्ती यातून दिसून येते.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी, भारतीय निवडणूक आयोगासमवेत झालेल्या बैठकीत कोविड बाबत तसेच ओमायक्रोन बाबत जागतिक परिस्थिती आणि देशांतर्गत परिस्थिती याबाबत माहिती दिली. कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि प्रतिसाद याबाबतचा तपशीलही सादर करण्यात आला. निवडणुका होणारी 5 राज्ये आणि त्यांची शेजारी राज्ये यावर सादरीकरणाचा प्रामुख्याने भर होता.        

 

* * *

S.Tupe/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1788284) Visitor Counter : 257