पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

झारखंडच्या पाकूर इथे झालेल्या बस अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक


पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधी मधून अपघातातील पीडितांसाठी सानुग्रह अनुदान जाहीर

Posted On: 05 JAN 2022 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जानेवारी 2022

 

झारखंड राज्यात पाकूर इथे झालेल्या बस अपघातात बळी गेलेल्यांप्रती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ,पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांचे तर, जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. 

या संदर्भात केलेल्या ट्वीट मध्ये, पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे –

“झारखंडच्या पाकूर इथे झालेल्या बस अपघाताच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाले आहे. या दु:खद प्रसंगी मी शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करतो. अपघातातील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, हीच प्रार्थना!  पंतप्रधान @narendramodi”

“या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना, पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपये तर, जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे”

 

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1787835) Visitor Counter : 155