पंतप्रधान कार्यालय
ग्रामीण पर्यटनाला चालना दिल्याबद्दल पंतप्रधानांच्या सन्मानार्थ काँगथॉन्गच्या लोकांनी रचलेल्या विशेष धूनबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता
Posted On:
28 NOV 2021 12:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली : 28 नोव्हेंबर 2021
गावाला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून चालना देण्यासाठी भारत सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानासाठी काँगथॉन्गच्या लोकांनी रचलेल्या विशेष धूनबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आहेत.
मेघालयच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"या सन्मानाप्रीत्यर्थ काँगथॉन्गच्या लोकांचा आभारी आहे. मेघालयच्या पर्यटन क्षमतेला चालना देण्यासाठी भारत सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि हो, राज्यात नुकत्याच झालेल्या चेरीच्या बहर महोत्सवाची सुंदर छायाचित्रेदेखील पाहिली. ती सुंदर दिसत आहे."
*********
ST/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775811)
Visitor Counter : 171
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam