निती आयोग

राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक याविषयी अधिक तपशीलवार माहिती


राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण -4 (2015-16)वर आधारित पायाभूत अहवाल

Posted On: 27 NOV 2021 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021

 

1.संसद सचिवांच्या सुधारणा आणि विकासविषयक जागतिक निर्देशांक उपक्रमाअंतर्गत, मानवी विकास निर्देशांक(HDI),जागतिक भूक निर्देशांक(GHI), जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक(GCI), मानवी भांडवल निर्देशांक(HCI), जागतिक अभिनव संशोधन निर्देशांक (GII) यांच्यासह एकूण 29 जागतिक मानकांच्या बाबतीत भारताच्या  कामगिरीचे मूल्यमापन केले जात आहे. महत्त्वाच्या सामाजिक, आर्थिक आणि इतर आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त निर्देशांकांची परीक्षण प्रक्रिया वेगवान करून परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी साधन म्हणून या निर्देशांकांचा वापर शक्य करणे आणि त्यानुसार भारताची या निर्देशांकांच्या बाबतीतील कामगिरी जागतिक पातळीवर सादर करणे या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत बहुआयामी गरिबी निर्देशांकासाठी नोडल मंत्रालय म्हणून नीती आयोगाची नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक (Global MPI) 2021 नुसार 109 देशांमध्ये भारताचा 66 वा क्रमांक आहे. राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांकाचा उद्देश Global MPI ची पुनर्रचना करणे आणि त्यामध्ये भारताच्या स्थानात सुधारणा करण्याच्या अधिक मोठ्या उद्देशासह सर्वसमावेशक सुधारणा कृती योजना तयार करण्यासाठी जागतिक धोरणाला अनुसरून आणि तरीही विशिष्ट असा भारतीय बहुआयामी गरिबी निर्देशांक निर्माण करणे हा  राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक (National MPI) प्रकल्पाचा उद्देश आहे. National MPI प्रकल्पासाठीचे नोडल मंत्रालय म्हणून नीती आयोग या निर्देशांकांच्या प्रकाशन संस्था नेमणे तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे त्यांच्या कामगिरीवर आधारित श्रेणीकारण करणे यासाठी जबाबदार आहे. नीती आयोगाने प्रत्येक राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांकाच्या संदर्भात 12 संबंधित मंत्रालयांशी सल्लामसलत करण्यासाठी एक आंतर-मंत्रालयीन बहुआयामी गरिबी निर्देशांक समन्वय समितीची (MPICC) स्थापना देखील केली आहे.

2.राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण -4 (2015-16) (NFHS-4)वर आधारित पायाभूत अहवाल, 12 संबंधित मंत्रालये आणि राज्य सरकारे तसेच ऑक्सफोर्ड  विद्यापिठाच्या ऑक्सफोर्ड गरिबी आणि मानवी विकास उपक्रमा अंतर्गत  (ओपीएचआय) आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) यांच्याशी सल्लामसलत करून नीती आयोगाने विकसित केला आहे.

3.राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक : पायाभूत अहवाल 2015-16 या वर्षी करण्यात आलेल्या चौथ्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणावर आधारित आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले.

4.राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-4 (2015-16) हे गरिबीत राहणाऱ्या सर्व वयोगटातील पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांच्या एकूण संख्येपैकी किमान निम्म्या व्यक्तींची गरिबी सर्व दृष्टीकोनातून कमी करण्याच्या 1.2 क्रमांकाच्या संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयाची पूर्ती करण्याच्या दिशेने दिलेले योगदान आहे. आरोग्य, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा या तीन परिमाणांच्या संदर्भात या अहवालात पोषण, बालके आणि पौगंडावस्थेतील मुलांचा मृत्यु, गर्भवती स्त्रियांची काळजी, शालेय शिक्षणाची वर्षे, शाळेतील उपस्थिती, स्वयंपाकासाठी लागणारे इंधन, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, निवास व्यवस्था, बँकेतील खाती आणि मालकीची मालमत्ता या घटकांबाबतच्या निर्देशांकांचा समावेश आहे.

5.राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-4 ( कार्यकाळ: 2015-16) मध्ये निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज, स्वयंपाकासाठी लागणारे इंधन, आर्थिक समावेशन या संदर्भातील महत्त्वाचे सरकारी कार्यक्रम आणि शालेय उपस्थितीचे प्रमाण, पोषण, माता आणि बाल आरोग्य इत्यादींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सुरु असलेले महत्त्वाचे इतर प्रयत्न यांच्या अंमलबजावणीला संपूर्ण महत्त्व देण्यात आले. म्हणून या सर्वेक्षणाचा अहवाल, राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या अनेक योजना सुरु होण्यापूर्वीच्या अगदी मूलभूत पातळीवरील परिस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठीचा एक उपयुक्त स्त्रोत ठरतो. पंतप्रधान आवास योजना (PMAY),  जल जीवन अभियान(JJM),  स्वच्छ भारत अभियान(SBM),  पंतप्रधान सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य), पंतप्रधान उज्ज्वला योजना(PMUY),  पंतप्रधान जन धन योजना(PMJDY),   पोषण अभियान आणि समग्र शिक्षण या त्यापैकी काही महत्त्वाच्या योजना आणि कार्यक्रम आहेत.

6. एकक पातळीवर NFHS साठी संकलित केलेली घरांची माहिती राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक मोजण्यासाठी पाया म्हणून काम करते. ही एकक पातळीवर 2015-16 मध्ये गोळा केलेली माहिती, सध्याच्या बहुआयामी गरिबी निर्देशांक अहवालात, मूलभूत पातळीवरील बहुआयामी गरिबीची कल्पना येण्यासाठी वापरण्यात आली आहे. म्हणजेच वर उल्लेख केलेल्या योजना सुरु होण्यापूर्वी आपला देश बहुआयामी गरिबी निर्देशांकाच्या संदर्भात नेमका कोणत्या पातळीवर होता ते समजण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरली. 2019-20 मध्ये झालेल्या पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून (NFHS-5)हाती आलेली माहिती वापरून या मुलभूत पातळीच्या संदर्भात देशाने केलेल्या प्रगतीचे मूल्यमापन केले जाईल. NFHS-5 मधील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठीची समग्र तथ्यपत्रके 24 नोव्हेंबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था आणि केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे जारी करण्यात आली. पुढच्या वर्षीचा एकक पातळीवरील यासंदर्भातील माहिती आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था आणि केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळाल्यानंतर NFHS-5 च्या 2019-20 या कालावधीतील माहितीवर अधारील राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक निश्चित करण्यात येईल.

7. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 (2019-20) च्या तथ्यविषयक माहितीच्या सरांशाचे प्राथमिक निरीक्षण उत्साहवर्धक आहे. त्यात असे दिसून आले आहे की, स्वयंपाकासाठी स्वच्छ  इंधन, स्वच्छता आणि वीजेची उपलब्धता सुधारली आहे. याचा अर्थ असा आहे की लोकांना सुविधा मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबतच, 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अहवाल देखील शाळेतील उपस्थिती, पिण्याचे पाणी, बँक खाती आणि निवास व्यवस्था अर्थातराहण्यासाठी पक्के घर   या सुविधा मिळण्याचे प्रमाण वाढल्याचे दाखवतात. या सुधारणा, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 (2019-20) कौटुंबिक सूक्ष्म माहिती, या आगामी निर्देशांकात बहुआयामी दारिद्र्य कमी झाल्याचे दर्शवितात.

8.राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 4 (2015-16) सुरु झाल्यापासून कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे मिळालेलं ठोस यश, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 (2019-20) च्या तथ्यविषयक माहिती आणि अहवालात राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाच्या आढाव्यात प्रतिबिंबित झालं आहे. प्रगती अहवाल, राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाच्या आधारभूत पातळीचा पाठपुरावा यामुळे ही घट बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक  2015-16 (NFHS 4) आणि 2019-20 (NFHS 5) यात दिसून येईल. घटक स्तरावरची राष्ट्रीय दारिद्य्र निर्देशांक 5 ची सूक्ष्म माहिती उपलब्ध झाल्यावर हा अहवाल प्रकाशित केला जाईल.

राष्ट्रीय बहुआयामी दारिद्रय निर्देशांक (राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण - 4, माहितीचा कालावधी -2015-16, यावर आधारित): पैलू, निदर्शक आणि निष्कर्ष

• भारताचा राष्ट्रीय बहुआयामी दारिद्रय निर्देशांक आरोग्य शिक्षण आणि जगण्याचा स्तर या तीन ढोबळ पैलूंवर कुटुंबांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती गोळा करतो.  राष्ट्रीय बहुआयामी दारिद्रय निर्देशांक पैलू, निदर्शक आणि मूल्य खालील प्रमाणे:

• राष्ट्रीय बहुआयामी दारिद्रय निर्देशांक (एमपीआय) दरडोई गुणोत्तर आणि त्याची तीव्रता केवळ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी तयार करण्यात आलेली नाही, तर सर्व जिल्ह्यांसाठी देखील हा निर्देशांक उपयुक्त ठरणार असून हेच या अहवालाचे वेगळेपण आहे.

यामुळे, केवळ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कामगिरीचा तुलनात्मक आराखडा आणि विश्लेषण करणे शक्य होईल असे  नाही, तर एकेका राज्यातील जिल्ह्यांच्या कामगिरीचेही तुलनात्मक विश्लेषण शक्य होईल. यात, देशाच्या संघराज्य संरचनेला दिलेले महत्त्व  अधोरेखित होते. तसेच , विविध योजना आणि उपक्रमांच्या प्रभावी अंमल बजावणीत, जिल्हा प्रशासनाची भूमिका आणि महत्वाचे स्थान देखील लक्षात घेण्यात आले आहे.

आकृति दुसरी :2: राज्यवार दरडोई गुणोत्तर (राष्ट्रीय बहुआयामी दारिद्रयरेषेखाली असलेलया गटाची  टक्केवारी)   चढत्या क्रमाने दर्शवण्यात आले  असून, त्यांच्या राज्यातील एमपीआय दडडोई गुणोत्तर खालीलप्रमाणे :

आकृति 3

एनएफएचएस (राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण) पाहा – ( आकडेवारी कालावधी-2019-20): एनएफएचएस तथ्यपत्रक आणि अहवालावरुन मांडण्यात आलेले प्राथमिक निष्कर्ष:

•पोषण आहारविषयक निदर्शके, बालके आणि कुमारवयीन बालकांचा मृत्यू, मातांचे आरोग्य, शालेय शिक्षणाची वर्षे आणि  मालमत्ता या सगळ्यांची सविस्तर गणना, एनएफएचएस-5 (2019-20) कडून कौटुंबिक पातळीवरील सूक्ष्म आकडेवारी आयआयपीएस आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केल्यानंतरच होऊ शकते. तर एमपीआयच्या आकडेवारीची गणना, राज्य किंवा जिल्ह्यांमधील प्रत्येक कुटुंबाचे एकाचवेळी 12 निर्देशकांच्या आधारे सर्वेक्षण केल्यावरच त्याची गणना करण्यात आली आहे. म्हणूनच,  त्यासाठी एनएफएचएस च्या कौटुंबिक पातळीवरील सूक्ष्म आकडेवारीची आवश्यकता आहे.

वीज, स्वयंपाकाचे इंधन आणि स्वच्छता निर्देशांकावरील प्राथमिक अंदाज सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी आयआयपीएस अर्थात आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था   आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 24 नोव्हें.-21 रोजी प्रसिद्ध केलेल्या एनएफएचएस-5(2019-20) फॅक्टशीट्समध्ये उपलब्ध आहेत.

•शाळांमधील उपस्थिती, पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था /स्वतःचे घर आणि बँक खाती यावरील प्राथमिक अंदाज केवळ 22 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी एनएफएचएस 5(2019-20) मध्ये उपलब्ध आहेत.

•आलेखामधील पिवळे पट्टे 2015-16 मधील(एनएफएचएस-4) राष्ट्रीय एमपीआयच्या एका निर्देशांकातील वंचित लोकसंख्येचे निदर्शक आहेत. हिरवे पट्टे 2019-20(एनएफएचएस-5) मधील वंचित लोकसंख्येचे निदर्शक आहेत.

•डेप्रिवेशन अर्थात वंचितांचे प्रमाण  =100 –  विशिष्ट निर्देशांकातील कामगिरी. उदाहरणार्थः जर वीजेची सोय असलेल्या घरांमध्ये राहणारे लोक =99% असतील  तर डेप्रिवेशन असेल  = 1%

a.एनएफएचएस5(2019-20) मधील विजेच्या सुविधेमधील वंचितांचे प्रमाण   कमी करण्यामध्ये सकारात्मक कल (एनएफएचएस-4 2015-16 पिवळ्या आणि एनएफएचएस-5 2019-20 हिरव्या रंगात)

b.सुधारित आणि विशेष स्वच्छता सुविधांमधील वंचितांचे प्रमाण   कमी करण्यामधील सकारात्मक कल (एनएफएचएस-4 2015-16 पिवळ्या आणि एनएफएचएस-5 2019-20 हिरव्या रंगात)

c.स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन वापरण्यातील वंचितांचे प्रमाण कमी करण्यामधील सकारात्मक कल (एनएफएचएस-4 2015-16 पिवळ्या आणि एनएफएचएस-5 2019-20 हिरव्या रंगात)

d.पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेमधील वंचितांचे प्रमाण   कमी करण्यामधील सकारात्मक कल (एनएफएचएस-4 2015-16 पिवळ्या आणि एनएफएचएस-5 2019-20 हिरव्या रंगात)

e.प्राथमिक शाळांमधील उपस्थितीमधील वंचितांचे प्रमाण   कमी करण्यामधील सकारात्मक कल (एनएफएचएस-4 2015-16 पिवळ्या आणि एनएफएचएस-5 2019-20 हिरव्या रंगात)

f.बँक खाते असणारे आणि त्यासंदर्भातील वंचितांचे प्रमाण   कमी करण्यामधील सकारात्मक कल (एनएफएचएस-4 2015-16 पिवळ्या आणि एनएफएचएस-5 2019-20 हिरव्या रंगात)

g.स्वतःचे पक्के घर असणे आणि त्याबाबत वंचितांचे प्रमाण डेप्रिवेशन कमी करण्यामधील सकारात्मक कल (एनएफएचएस-4 2015-16 पिवळ्या आणि एनएफएचएस-5 2019-20 हिरव्या रंगात)

जर एखादी व्यक्ती कच्च्या किंवा अर्ध पक्क्या घरात राहत असेल तर एमपीआयने एनएफएच-5 मधील व्याख्येनुसार त्याची वंचित अशी व्याख्या केली आहे.

JPS/SC/RA/SP/PM

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775638) Visitor Counter : 5883