पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशला भेट देतील आणि झाशी येथे 'राष्ट्र रक्षा समर्पण पर्व' मध्ये संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताला महत्त्वपूर्ण चालना देतील


पंतप्रधान स्वदेशी बनावटीची रचना आणि देशात विकसित हलकी लढाऊ हेलिकॉप्टर, ड्रोन्स आणि नौदलाच्या जहाजांसाठी प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट सशस्त्र दलांच्या सेवा प्रमुखांना औपचारिकपणे सुपूर्द करतील

पंतप्रधान रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रांसाठी प्रोपल्शन सिस्टीम तयार करण्यासाठी उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या झाशी नोड येथे 400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करतील

पंतप्रधान - राष्ट्रीय छात्र सेनेचे माजी कॅडेट - एनसीसीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे पहिले सदस्य म्हणून नावनोंदणी करतील

पंतप्रधान, राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शहीदांना आभासी श्रद्धांजली अर्पण करण्यासंबंधी सुविधा राष्ट्राला समर्पित करतील

Posted On: 17 NOV 2021 4:00PM by PIB Mumbai

 

19 नोव्हेंबर 2021 रोजी उत्तर प्रदेशच्या झाशी येथील भेटीदरम्यान, संध्याकाळी 5:15 वाजता, 'राष्ट्र रक्षा समर्पण पर्व' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण क्षेत्रातील अनेक उपक्रमांचे उदघाटन आणि लोकार्पण करतील. झाशी येथे 17-19 नोव्हेंबर दरम्यान 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' चा  एक भाग म्हणून 'राष्ट्र रक्षा समर्पण पर्व'चे आयोजन करण्यात आले आहे.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताला चालना देण्यासाठी पंतप्रधान औपचारिकपणे सशस्त्र दलांच्या सेवा प्रमुखांना स्वदेशी बनावटीची विकसित उपकरणे सुपूर्द करतील. यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ची संरचना आणि विकसित केलेले हलके लढाऊ हेलिकॉप्टर (एलसीएच) हवाई दलाच्या प्रमुखांना सुपूर्द केले जाईल, तर भारतीय स्टार्टअप्सने विकसित केलेले ड्रोन/यूएव्ही लष्करप्रमुखांना आणि डीआरडीओने नौदलाच्या जहाजांसाठी डिझाइन केलेले आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने (BEL) तयार केलेले प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट नौदल प्रमुखांना सुपूर्द केले जातील.  प्रभावीपणे लढण्यासाठी लढाऊ हेलिकॉप्टर प्रगत तंत्रज्ञान आणि स्टील्थ वैशिष्टयांनी सुसज्ज आहे. भारतीय सशस्त्र दलांद्वारे तैनात भारतीय युएव्ही देखील भारतीय ड्रोन उद्योग परिसंस्थेच्या वाढत्या परिपक्वतेचा पुरावा आहे. प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट विनाशिका, फ्रिगेट्ससह नौदलाच्या विविध जहाजांमध्ये वापरला जाईल.

पंतप्रधान उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या झाशी नोड येथे 400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. रणगाडा -विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रांसाठी प्रोपल्शन सिस्टीम तयार करण्यासाठी कारखाना उभारण्यासाठी भारत डायनॅमिक्स लिमिटेडद्वारे हा प्रकल्प कार्यान्वित केला जात आहे.

एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांना एनसीसीशी पुन्हा संपर्क साधता यावा यासाठी औपचारिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान एनसीसीच्या माजी विद्यार्थी संघटनेचा प्रारंभ करतील. ही संघटना एनसीसीची उद्दिष्टे पुढे नेईल आणि राष्ट्र उभारणीत मदत करेल. यावेळी एनसीसीचे माजी कॅडेट असलेले पंतप्रधान या संघटनेचे पहिले सदस्य म्हणून नावनोंदणी करतील.

पंतप्रधान एनसीसीच्या तिन्ही विभागांसाठी सिम्युलेशन प्रशिक्षण सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने एनसीसी कॅडेट्ससाठी सिम्युलेशन प्रशिक्षणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचाo शुभारंभ करतील. त्यात एनसीसीच्या लष्कर विभागासाठी रायफल फायरिंग सिम्युलेटर, हवाई विभागासाठी मायक्रोलाइट फ्लाइंग सिम्युलेटर आणि नौदल विभागासाठी रोइंग सिम्युलेटरची स्थापना यांचा समावेश आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी पॉवर्ड इलेक्ट्रॉनिक किऑस्क राष्ट्राला समर्पित करतील. यामध्ये अभ्यागतांना केवळ बटण दाबून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करता येईल.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1772590) Visitor Counter : 210