अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थ सचिव डॉ. टी वी सोमनाथन यांनी वस्तू खरेदी आणि बिगर-सल्लागार सेवांसाठी आदर्श निविदा दस्त ऐवज (MTD) केले जारी
हे दस्त ऐवज (MTD) विशेषतः ई-खरेदी, सार्वजनिक खरेदीत डिजिटलीकरण प्रक्रिया सोपी करणे आणि डिजिटल इंडियाचे लक्ष्य गाठण्यास मदत होईल या उद्देशाने तयार करण्यात आले आहेत.
Posted On:
29 OCT 2021 4:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2021
केंद्रीय अर्थ आणि व्यय सचिव डॉ. टी वी सोमनाथन यांनी आज वस्तू खरेदी आणि बिगर-सल्लागार सेवांसाठी आदर्श निविदा दस्त ऐवज (MTD) जारी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, अस्तित्वात असलेले नियम आणि प्रक्रियांचा आढावा घेण्यावर भर दिला होता. त्या अनुषंगाने हे दस्त ऐवज तयार करण्यात आले आहेत.
हे दस्त ऐवज (MTD) सरकारच्या सुलभ आणि कार्यक्षम ई- खरेदीची प्रक्रिया अवलंबण्यासंबंधी आवश्यक त्या सर्व गरजा डोळ्यापुढे ठेऊन तयार करण्यात आले आहेत. या प्रकारच्या पुढाकारांमुळे डिजिटल इंडियाचे लक्ष्य गाठण्यासाठी सार्वजनिक खरेदी प्रक्रियाचे सुलभीकरण आणि प्रमाणीकरण मोलाची मदत करेल.
निविदा दस्त ऐवज हे सरकार आणि उद्योगांमधला महत्वाचा दुवा आहे आणि त्यामुळेच धोरणांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा निर्णायक मार्ग आहे. एकसारख्या निविदा दस्त ऐवज संचामुळे सरकारची धोरणं प्रभावीपणे, सुसंगतपणे आणि समानतेने विशद करून सांगता येतात. सार्वजनिक खरेदी धोरणं समजून घेताना आणि त्यांची अंमलबजावणी करतात सुसूत्रता येईल तसेच त्या धोरणांचे अनुपालन वाढून खरेदी प्रक्रियेवर जनतेचा विश्वास बसेल. तसेच, सर्वोत्तम खरेदी प्रक्रिया तयार करण्यासोबतच, एकसमान निविदा दस्त ऐवज असल्याने धोरणांचा सकारात्मक परिणाम वाढून, यात मोठ्या अर्थव्यवस्थांचा सहभाग आणि स्पर्धा वाढेल. यामुळे करदात्यांच्या पैशाचे मोल वाढविण्यासाठी अधिक सक्षम बाजारपेठा तयार होतील. निविदा भरणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील यामुळे त्यांच्या उत्पादनांसाठी विस्तारित बाजारपेठा उपलब्ध होतील.
त्यानुसार, वस्तू आणि बिगर - सल्लागार सेवा घेण्यासाठी आदर्श निविदा दस्त ऐवज (MTD) आता विकसित करण्यात आले आहेत. या दस्तावेजांमुळे निविदा तर्कसंगत आणि सोप्या होतील. सूक्ष्म आणि लघु उद्योग, भारतात तयार झालेल्या उत्पादनांना प्राधान्य आणि स्टार्टअप्सना फायदे देणे, यासारख्या सरकारच्या विविध खरेदी धोरणात असलेल्या तरतुदी एकत्र करण्यासोबतच MTD मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उत्तम पद्धतींचा अवलंब केला जाईल. मंत्रालये, विभाग, केंद्रीय सार्वजनिक उपक्रम, इतर संस्था आणि तज्ञ व्यक्तींशी दोन टप्प्यात सल्लामसलत करून MTD तयार करण्यात आले आहेत.
अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने जारी केलेले MTD हे मार्गदर्शक टेम्प्लेट असतील. सरकारचा डिजिटल इंडियावर असलेला भर लक्षात घेऊन, MTD ची सॉफ्ट टेम्प्लेट जारी करण्यात येत आहे, जेणेकरून त्यांचा वापर करणे संबंधित विभागांना सोपे जाईल. मंत्रालये/विभागांना यात त्यांच्या सोयीनुसार आणि स्थानिक गरजांनुसार बदल करण्याची मुभा असेल. खरेदी अधिकाऱ्यांना प्रत्येक MTDचा वापर करणे अधिक सोपे व्हावे म्हणून वेगळी विस्तृत मार्गदर्शक सूचना देखील तयार करण्यात आल्या आहेत. अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने जारी केलेले MTD हे मार्गदर्शक टेम्प्लेट असतील.
आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी सरकारी संस्था विविध वस्तू आणि बिगर - सल्लागार सेवा घेत असतात. गेल्या काही काळात, उत्तम राज्यकारभार, पारदर्शकता, निष्पक्षपणा, स्पर्धा आणि पैशाचे मोल वाढविण्यासाठी भारत सरकारने अनेक लक्षणीय धोरणं आखली आहेत. सर्वंकष आढावा घेतल्यानंतर मार्च 2017 मध्ये सामान्य आर्थिक नियम जरी करण्यात आले. त्यासोबतच तीन खरेदी माहिती पुस्तिका, सल्लागार सेवा तसेच इतर सेवा घेण्यासाठीची माहिती पुस्तिका, 2017, कामांविषयी खरेदीची माहिती पुस्तिका विकसित करण्यात आल्या आहेत.
आदर्श निविदा दस्त ऐवज तयार करून जारी करणे, हे सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांचा आणि पद्धतींचा आढावा घेण्याच्या निरंतर प्रक्रियेचा भाग आहे. 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 दरम्यान चालविल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून, यावर कॅबिनेट सचिव यावर लक्ष ठेऊन असतात.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767528)
Visitor Counter : 300
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam