पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 23 ऑक्टोबर रोजी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाचे लाभार्थी आणि भागधारकांशी साधणार संवाद
प्रविष्टि तिथि:
22 OCT 2021 4:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2021
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 23 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून,आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाच्या लाभार्थी आणि भागधारकांशी संवाद साधणार आहेत. हा संवाद साधल्यानंतर या कार्यक्रमात ते भाषण करणार आहेत.
पंतप्रधानांच्या संकल्पनेतील 'आत्मनिर्भर भारत ' साकारण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनापासून प्रेरणा घेऊन 1 ऑक्टोबर 2020 रोजी स्वयंपूर्ण गोवा हा उपक्रम सुरु करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत, राज्य सरकारच्या अधिकाऱ्याची 'स्वयंपूर्णा मित्र' म्हणून नियुक्ती केली जाते. हा स्वयंपूर्ण मित्र नेमून दिलेल्या पंचायत किंवा नगरपालिकेला भेट देतो, लोकांशी संवाद साधतो, अनेक सरकारी विभागांशी समन्वय साधतो आणि पात्र लाभार्थ्यांना विविध सरकारी योजना आणि या योजनांचे लाभ उपलब्ध होत आहेत हे सुनिश्चित करतो.
यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत.
Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1765738)
आगंतुक पटल : 339
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam