पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सेवेत कार्यरत असताना कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस स्मृती दिनानिमित्त पंतप्रधानांकडून श्रद्धांजली अर्पण

प्रविष्टि तिथि: 21 OCT 2021 10:51AM by PIB Mumbai

कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

"कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आणि गरजेच्या प्रसंगी इतरांना मदत करण्यासाठी आपल्या पोलिस दलांनी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांबद्दल पोलीस स्मृतिदिनानिमित्त मी कृतज्ञता व्यक्त करतो. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.”, असे पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हंटले आहे.

***



STupe/SKane/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1765402) आगंतुक पटल : 294
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam