पंतप्रधान कार्यालय

कोविड प्रतिबंधक लसीच्या पहिल्या मात्रेचे 100% लसीकरण पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी देवभूमीच्या लोकांचे केले अभिनंदन

Posted On: 18 OCT 2021 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑक्टोबर 2021

 

कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या पहिल्या मात्रेचे 18 वर्षांवरील वयोगटासाठीचे 100% लसीकरण पूर्ण केल्याबद्दल देवभूमीच्या नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी असेही म्हटले आहे की उत्तराखंडची ही कामगिरी देशातील कोविड 19 विरुद्धच्या लढाईत अत्यंत महत्त्वाची आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले,

"देवभूमीच्या लोकांना खूप खूप शुभेच्छा. कोविड विरुद्धच्या लढाईमध्ये उत्तराखंडची ही कामगिरी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मला खात्री आहे की जागतिक महामारीविरोधात लढा देण्यामध्ये आपली लसीकरण मोहीम सर्वाधिक प्रभावी सिद्ध होणार आहे आणि यामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे".

 

 

* * *

S.Tupe/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1764688) Visitor Counter : 222