पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी व्हिसासोलाय ल्होउंगु यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

Posted On: 12 OCT 2021 10:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 ऑक्टोबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडचे नेते व्हिसासोलाय ल्होउंगु यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

ट्विट संदेशाद्वारे पंतप्रधान म्हणाले:

व्हिसासोलाय ल्होउंगु हे अतिशय मेहनती आणि समर्पित व्यक्तिमत्व होते आणि नागालँडच्या प्रगतीसाठी तसेच नागा लोकांच्या सशक्तीकरणासाठी ते अत्यंत उत्कटतेने कार्य करीत. नागालँड राज्यात भाजपाला मजबूत करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने मी व्यथित झालो आहे. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो.

 

 

 

 

 S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1763415) Visitor Counter : 194