गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्य आपत्ती निवारण निधीच्या (SDRF) केंद्र सरकारच्या वाट्याचा दुसरा हप्ता जारी करायला मंजुरी दिली
सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारांना कोविड -19 मुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्यावरील खर्च भागवण्यासाठी त्यांच्या एसडीआरएफमध्ये पुरेसा निधी उपलब्ध होईल
Posted On:
01 OCT 2021 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2021
केंद्र सरकारने 25.09.2021 रोजी राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीआरएफ) अंतर्गत मदतीचे निकष सुधारित करण्याचा आदेश जारी केला होता, त्यात कोविड 19 मुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद केली आहे. एसडीआरएफ निकषांमध्ये ही तरतूद करण्यात आली आहे जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाने डब्ल्यूपी (सिव्हिल नंबर 539/2021 आणि 554/2021) दिनांक 30.06.2021 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) 11.09.2021 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करता येईल.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारांना त्यांच्या एसडीआरएफमध्ये पुरेसा निधी उपलब्ध होईल. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 23 राज्यांना राज्य आपत्ती निवारण निधीमधील केंद्र सरकारच्या वाट्याचा 7,274.40 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता आगाऊ जारी करण्यास मंजुरी दिली आहे. 5 राज्यांना 1,599.20 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता आधीच जारी करण्यात आला आहे.
2021-22 च्या आर्थिक वर्षात, राज्य सरकारांकडे त्यांच्या एसडीआरएफ मध्ये शिल्लक रकमेव्यतिरिक्त राज्याच्या हिश्श्यासह आता 23,186.40 कोटी रुपयांची रक्कम असेल. यामुळे कोविड 19 मुळे आणि अन्य अधिसूचित आपत्तींमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान आणि मदत देता येईल.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1759942)
Visitor Counter : 350
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam