संरक्षण मंत्रालय
सरकारने कौटुंबिक निवृत्तिवेतनासाठी दिव्यांग अवलंबितांची उत्पन्न मर्यादा वाढवली
Posted On:
28 SEP 2021 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2021
ठळक वैशिष्ट्ये :
- कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी मानसिक किंवा शारीरिक अपंगत्वाने ग्रस्त मुले/भावंडांच्या उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ
- महागाई भत्त्यासह कौटुंबिक पेन्शन व्यतिरिक्त इतर स्त्रोतांद्वारे सध्याच्या मासिक 9,000/- रुपये पात्रता उत्पन्न मर्यादेत वाढ
संरक्षण मंत्रालयाने मानसिक किंवा शारीरिक अपंगत्वाने ग्रस्त मुले/भावंडांना कौटुंबिक निवृत्तीवेतन देण्यासाठी उत्पन्नाचे निकष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, असे मूल/भावंड आजीवन कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी पात्र असेल, जर त्याचे/तिचे कौटुंबिक निवृत्तीवेतनाव्यतिरिक्त इतर स्त्रोतांद्वारे एकूण उत्पन्न सामान्य दराने पात्र कौटुंबिक निवृत्तीवेतनापेक्षा कमी असेल म्हणजेच मृत सरकारी कर्मचाऱ्याच्या शेवटच्या वेतनाच्या 30% अधिक महागाई भत्ता पॆक्षा कमी असेल.
अशा प्रकरणांमध्ये आर्थिक लाभ 08.02.2021 पासून लागू होईल. सध्या, अपंग मूल/भावंड कौटुंबिक निवृत्तीवेतनसाठी पात्र आहे जर अपंग मुलाचे/भावंडांचे एकूण मासिक उत्पन्न महागाई भत्त्यासह 9,000/ रुपयांपेक्षा जास्त नसेल तर.
M.Iyengar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1758977)
Visitor Counter : 319