सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय महिला फेन्सर भवानी देवीच्या तलवारीचा पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांच्या ई-लिलावामध्ये समावेश

लिलावातून मिळणारी रक्कम 'नमामी गंगे कोष' मध्ये जमा होणार

Posted On: 28 SEP 2021 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28  सप्टेंबर 2021

भवानी देवीसाठी हा एक महत्त्वाचा दिवस होता जेंव्हा ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होणारी पहिली भारतीय महिला फेन्सर बनली. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिला सामना जिंकून इतिहास घडवला. ही एक मोठी कामगिरी  होती.  कारण कोणतीही भारतीय महिला फेन्सर त्या पातळीवर पोहोचली नव्हती. पुढील सामन्यात तिला पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले  असले तरी भारताच्या आशा आणिआकांक्षा उंचावण्यासाठी ते पुरेसे होते.

तामिळनाडू इथे राहणारी भवानी देवीचे पूर्ण नाव चडलवादा आनंद सुंदररामन भवानी देवी आहे. तिने 2003 मध्ये आपली  क्रीडा कारकीर्द सुरू केली, परंतु तिला तलवारबाजी करण्यात अजिबात रस नव्हता. भवानी देवीने तलवारबाजीची  निवड करण्यामागे एक अतिशय रोचक कथा आहे. जेंव्हा तिने शालेय खेळांमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला, तेंव्हा तिला समजले की प्रत्येक वर्गातून फक्त सहा विद्यार्थ्यांनाखेळांसाठी निवडले जाईल. भवानीची पाळी येईपर्यंत मुलांची सर्व खेळांमध्ये निवड झाली होती. नियतीने ठरवले असावे  तसे, कोणत्याही विद्यार्थ्याने तलवारबाजीसाठी प्रवेशघेतला नव्हता. क्षणाचाही विलंब न करता, तिने या बऱ्यापैकी नवीन खेळासाठी आपले नाव नोंदवले आणि प्रशिक्षण सुरू केले. आणिपुढचा इतिहास आपल्यासमोर आहे.

तलवारबाजी प्रकारात ती आठ वेळा राष्ट्रीय विजेता राहिली आहे. ऑलिम्पिकमध्ये आपला पहिला सामना जिंकून  इतिहास रचणाऱ्या भवानीचाही अन्य पदक विजेत्यांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्कार केला होता. यावेळी तिने पहिल्यासामन्यात विजय मिळवलेली तलवार पंतप्रधानांना भेट म्हणून दिली.

ज्या तलवारीने देशाचा गौरव वाढवला ती ऐतिहासिक तलवार आता तुमचीही होऊ शकते आणि तो क्षण कायम लक्षात ठेवाल. ही तलवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांच्या ई-लिलावात आहे.  तुम्हाला जर ही तलवार हवी असेल तर 17 सप्टेंबर ते  7 ऑक्टोबर 2021  पर्यंत चालणाऱ्या pmmementos.gov.in/ ई-लिलावात सहभागी व्हा. यापूर्वीही  पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव झाला आहे. शेवटचा लिलाव  2019 मध्ये झाला होता. मागील लिलावात सरकारने 15 कोटी  13 लाख रुपये कमावले होते. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ती पूर्ण रक्कम गंगा नदी स्वच्छ आणि निर्मळ बनवण्यासाठी  'नमामि गंगे कोष' मध्ये जमा करण्यात आली होती. यावेळीही लिलावातून मिळणारी रक्कम  'नमामी गंगा कोष' साठी दिली जाईल.

 

S.Thakur/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1758948) Visitor Counter : 109