पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी गुलाब चक्रीवादळाविषयी दूरध्वनीवरून चर्चा केली
प्रविष्टि तिथि:
26 SEP 2021 4:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि गुलाब चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी केंद्राकडून शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन दिले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्याशी बोललो आणि गुलाब चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्राकडून शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन दिले. मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो."
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1758299)
आगंतुक पटल : 221
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam