दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार विभागाने दूरसंचार सेवा सुधारणांना केला आरंभ
केवायसी प्रक्रियेचे सुलभीकरण
Posted On:
21 SEP 2021 10:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2021
“उपेक्षित क्षेत्रासाठी जागतिक दर्जाचे इंटरनेट आणि टेली-कनेक्टीविटी पुरवणे हेच दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांचे लक्ष्य आहे”, या दूरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी नुकत्याच केलेल्या विधानानुसार हे लक्ष्य साध्य करण्याच्या उद्देशाने भारत सरकारचे दूरसंचार विभाग व दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी ग्राहक परिचय म्हणजेच केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याच्या हेतूने काही निर्देश आज जारी केले. याद्वारे मंत्रीमंडळाने 15/09/2021 रोजी घोषित केलेल्या दूरसंचार सेवा निगडीत सुधारणा अमलात आणल्या गेल्या आहेत.
सध्या उपभोक्त्याला नवीन मोबाईल जोडणी घेण्यासाठी किंवा जोडणीत प्रिपेड ते पोस्टपेड वा त्याउलट बदल करण्यासाठी केवायसी प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यासाठी स्वतःची ओळख पटवणाऱ्या आणि रहिवासाचा पुरावा असलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती घेऊन विक्रीकेंद्रात स्वतः उपस्थित रहावे लागते.
आता ऑनलाईन सेवा हा पर्याय सहज स्वीकारला गेला आहे आणि बहुतांशी ग्राहक सेवांमध्ये ओटीपी पडताळणी करुन तो दिला जातो. या कोविड कालखंडात उपभोक्त्याच्या सोयीसाठी व व्यवसाय सुलभतेसाठी थेट संपर्काविना सेवांना प्रोत्साहन दिले जात आहे.
उपयोक्त्याचे ‘आधार’ नोंदणी वापरासाठी तसेच इतर जनविषयक तपशील UIDAI कडून इलेक्ट्रॉनिकली प्राप्त करण्यासाठी ग्राहकाची परवानगी आवश्यक असते
हे लक्षात घेउन दूरसंचार मंत्रालयाने पुढील आदेश त्वरीत अमलात आणून संपर्कविना, ग्राहककेंद्रीत आणि सुरक्षित केवायसी प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत.
- आधार आधारीत ई-केवायसी
नवीन मोबाईल जोडणी घेण्यासाठी आधार-आधारित ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा अमलात आणली आहे. UIDAI कडून ग्राहक पडताळणीसाठी प्रत्येकी 1 रू आकारला जाईल. ही प्रक्रिया पूर्णतः विनाकागद आणि डिजिटल स्वरुपाची असेल आणि दूरसंचार सेवा पुरवठादाराला UIDAI कडून ग्राहकाचे छायाचित्र व इतर वैयक्तिक तपशील पुरवले जातील
- सेल्फ केवायसी
या प्रक्रियेत, ॲप वा पोर्टल आधारित प्रक्रियेद्वारे ग्राहकाला मोबाईल जोडणी दिली जाईल. यामध्ये ग्राहकाला घर वा कार्यालयात बसल्याबसल्या मोबाईल जोडणीसाठी अर्ज करता येईल. आणि UIDAI किंवा डिजीलॉकरकडून तपशीलांची इलेक्ट्रॉनिकली पडताळणी करून घेतल्यानंतर त्याला सिम घरपोच मिळेल.
- मोबाईल बील भरणा करण्याच्या पद्धतीत प्रिपेड ते पोस्टपेड वा पोस्टपेड ते प्रिपेड हे बदल ओटीपी आधारीत
मोबाईल आधारित बिलिंग व्यवस्था बदलासाठी ग्राहकाला मोबाईल जोडणी प्रिपेड ते पोस्टपेड किंवा उलट प्रकारे करण्यासाठी ओटीपी आधारित पडताळणी घरच्या घरी करून घेता येईल.
सविस्तर निर्देश दूरसंचार विभागाचे संकेतस्थळ (https://dot.gov.in/relatedlinks/telecom-reforms-2021)येथे बघता येतील.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1756859)
Visitor Counter : 320
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam