निती आयोग
‘भारतातल्या नागरी नियोजन क्षमतेतल्या सुधारणा’ याबाबत नीती आयोग अहवाल जारी करणार
Posted On:
15 SEP 2021 2:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2021
नीती आयोग, उद्या 16 सप्टेंबरला, ‘भारतातल्या नागरी नियोजन क्षमतेतल्या सुधारणा’ याबाबत अहवाल जारी करणार आहे.
नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हा अहवाल जारी करतील. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताब कांत आणि विशेष सचिव डॉ के राजेश्वर राव आणि संबंधित मंत्रालयाचे सचिव यावेळी उपस्थित असतील.
‘भारतातल्या नागरी नियोजन क्षमतेतल्या सुधारणा’ याबाबत नीती आयोगाने ऑक्टोबर 2020 मध्ये सल्लागार समिती स्थापन केली होती. हा अहवाल पूर्ण करून समितीने त्यांना दिलेल्या आदेशाची पूर्तता केली आहे.
नागरी नियोजनाच्या विविध पैलूंवर या अहवालात शिफारसी करण्यात आल्या आहेत. निरोगी शहरांसाठी नियोजन, नागरी जमिनीचा पुरेपूर वापर,मानवी संसाधन क्षमता वृद्धिगत करणे,स्थानिक नेतृत्व उभारणी, खाजगी क्षेत्राची भूमिका विस्तारणे आणि नागरी नियोजन शिक्षण प्रणाली अद्ययावत करणे यासारख्या पैलूंवर या अहवालात शिफारसी करण्यात आल्या आहेत.
* * *
Jaydevi PS/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1755038)