आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केरळमधील कोळीकोड जिल्ह्यात आढळला निपाह विषाणूचा एक रुग्ण
राज्यातील सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये मदत करण्यासाठी केंद्राकडून एक पथक रवाना
Posted On:
05 SEP 2021 8:00AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2021
केरळमधील कोळीकोड जिल्ह्यात निपाह विषाणूचा एक रुग्ण आढळला आहे.
निपाह संदर्भातील हा संशयित रुग्ण 12 वर्षांचा मुलगा आहे, ज्यामध्ये एन्सेफलायटीस आणि मायोकार्डिटिसची लक्षणे आढळली आहेत, 3 सप्टेंबर रोजी केरळच्या कोळीकोड जिल्ह्यात या संदर्भातील नोंद करण्यात आली.
फळ वटवाघळांच्या लाळेमुळे हा विषाणू पसरतो. या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.
केंद्र सरकारने NCDC चे एक पथक राज्याकडे पाठविले आहे, ते आज पोहोचेल. राज्याला लागणारी आवश्यक ती तांत्रिक मदत या पथकाकडून करण्यात येणार आहे.
केंद्राने पुढील तातडीच्या सार्वजनिक आरोग्याबाबतच्या खबरदारीच्या उपायांची शिफारस केली आहे :
1. यासारखे भूस्वरूप असणारया गावात आणि परिसरात , कुटुंबांमध्ये (विशेषतः मलप्पुराम) उपचाराधीन असलेल्या रुग्णांचा शोध घ्या.
2. गेल्या 12 दिवसांपासून उपचाराधीन रुग्णांची संपर्क यादी तयार करणे
3. यादीतील लोकांना सक्तीने अलग ठेवणे आणि संशयितांना वेगळे करणे
4. प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी नमुना गोळा करणे आणि चाचणी करणे
हे लक्षात घेतले पाहिजे की, 2018 मध्ये केरळमधील कोळीकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यात निपाह विषाणूचा उद्रेक झाला होता.
***
MaheshC/SeemaS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1752289)
Visitor Counter : 316