आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी कोविड–19 बाबत अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेचा आणि त्यांच्या राखीव साठ्यांचा घेतला आढावा
8 औषधांच्या राखीव साठ्यांचा घेतला आढावा, देशात पुरेसा साठा आणि कच्चा माल उपलब्ध
प्रविष्टि तिथि:
01 SEP 2021 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2021
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खत मंत्री मनसुख मांडवीय यांनी देशातील कोविड-19 बाबतच्या आवश्यक औषधांचा पुरवठा आणि त्यांची उपलब्धता यांचा आज आढावा घेतला.
सर्व आवश्यक औषधांचा साठा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे या आढाव्या दरम्यान आढळून आले. या औषधांसाठी लागणारा कच्चा माल देखील पुरेशा प्रमाणात देशात उपलब्ध आहे.
8 औषधांसाठी धोरणात्मक राखीव साठा तयार करण्यात आला असून देशात ती उपलब्ध आहेत. ही औषधे याप्रमाणे-
- टॉसिलिझुमॅब
- मेथाइल प्रेडिनिसोलोन
- इनाक्सोपिरिन
- डेक्सामेथासोन
- रेमडेसिविर
- अम्फोटेरिसिन बी डेओक्सीकोलेट
- पोसाकोनाझोल
- इन्ट्रोव्हिनस इम्युनोग्लोबिलिन (आयव्हीआयजी)
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यावेळी आढावा बैठकीस उपस्थित होते.
* * *
N.Chitale/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1751189)
आगंतुक पटल : 225