आयुष मंत्रालय
‘आझादी का अमृत महोत्सवा’चा भाग म्हणून सात केंद्रीय मंत्री उद्या योग-ब्रेक मोबाईल ऍप्लिकेशनचा प्रारंभ करणार
Posted On:
31 AUG 2021 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2021
केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त सुरू केलेल्या 'आझादी का अमृत महोत्सव' उत्सवाचा एक भाग म्हणून, केंद्रीय आयुष आणि बंदर, जहाज व महामार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, सहा केंद्रीय मंत्र्यांसह,उद्या (1 सप्टेंबर, 2021) विज्ञान भवन येथे एका कार्यक्रमात योग-ब्रेक मोबाईल ऍप्लिकेशनचा प्रारंभ करणार आहेत. आयुष मंत्रालयाने 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान अनेक कार्यक्रम आणि अभियान आयोजित केले आहेत.
यामध्ये 5 मिनिटांच्या 'योगा ब्रेक प्रोटोकॉल'मध्ये कामाच्या ठिकाणी व्यक्तींची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने कामावरचा ताण कमी करण्यासाठी, ताजेतवाने करण्यासाठी आणि पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी तयार केलेल्या अतिशय उपयुक्त योग पद्धती आहेत. "योग ब्रेक" (Y-Break) ही संकल्पना जगभरातील व्यावसायिकांसाठी उपयुक्त आहे. प्रख्यात तज्ञांनी चाचणी करून ते काळजीपूर्वक विकसित केले आहे.
विविध हितधारकांच्या समन्वयाने सहा प्रमुख महानगरांमध्ये प्रायोगिक प्रकल्प आधार म्हणून हे मॉड्यूल जानेवारी 2020 मध्ये सुरू करण्यात आले. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने देशातील सहा प्रमुख योग संस्थांच्या सहकार्याने एकूण 15 दिवसांची चाचणी घेतली, ज्यात विविध खाजगी आणि सरकारी संस्थांमधून एकूण 717 जण सहभागी झाले आणि ही चाचणी खूप यशस्वी झाली.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1750876)
Visitor Counter : 193