पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान जन-धन योजनेला सात वर्षे पूर्ण पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त- ‘भारताच्या विकासाच्या कक्षेचे कायमस्वरुपी परिवर्तन करणारा उपक्रम’ असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार
Posted On:
28 AUG 2021 11:18AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 28 ऑगस्ट 2021
पंतप्रधान जन-धन योजनेला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांचे देखील पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.
ट्वीट संदेशांच्या मालिकेद्वारे पंतप्रधान म्हणाले :
“#PMJanDhan या भारताच्या विकासाच्या कक्षेत कायमस्वरूपी परिवर्तन घडवून आणणाऱ्या उपक्रमाची सात वर्षे पूर्ण झालेली आज आपण पाहत आहोत. या योजनेने असंख्य भारतीयांना आर्थिक समावेशकता आणि सन्माननीय आयुष्याची तसेच सशक्तीकरणाची हमी मिळवून दिली. जन-धन योजनेने सरकारी व्यवहारातील पारदर्शकता वाढवायला देखील मदत केली आहे.
#PMJanDhan ही योजना यशस्वी करण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांचे मी कौतुक करतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील जनतेला अधिक उत्तम दर्जाचे जीवन जगता येईल याची हमी मिळाली आहे.”
***
SP/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1749840)
Visitor Counter : 313
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada