माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अनुराग ठाकूर यांनी “मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन” या ई-फोटो प्रदर्शनाचे आणि “चित्रांजली@75” व्हर्च्युअल फिल्म पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन केले


'तुमची राज्य घटना जाणून घ्या' मोहीम सरकार राबवणार : ठाकूर

चित्रांजली @75 स्वातंत्र्य सैनिकांच्या पवित्र आठवणी जागवेल, मंत्रालय भविष्यात असे चित्रपट लोकांपर्यंत घेऊन जाईल: ठाकूर

Posted On: 27 AUG 2021 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑगस्‍ट 2021

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, आणि युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज "मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन" या ई-फोटो प्रदर्शनाचे आणि "चित्रांजली@75" या व्हर्च्युअल फिल्म पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन केले . माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन हे देखील उपस्थित होते.

व्यापक लोकसंपर्क उपक्रमांद्वारे नवभारताच्या प्रवासाचे दर्शन घडवण्याच्या आणि स्वातंत्र्य लढ्यातील अपरिचित नायकांसह स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्याच्या उद्देशासह स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विविध माध्यम विभागांसह माहिती आणि प्रसारण  मंत्रालयाद्वारे साजरा करण्यात येत असलेल्या' आयकॉनिक वीक'चा भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या  कार्यक्रमात बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, ई-फोटो  प्रदर्शनाचा उद्देश लोकांना राज्य घटनेच्या निर्मितीविषयी माहिती देणे हा आहे. जन-भागीदारीच्या दिशेने एक पाऊल असलेले हे प्रदर्शन देशातील तरुणांना संविधानाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करेलच तसेच त्यांना त्यांच्या हक्कांची माहिती देईल आणि राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्यांच्या भावनेबाबत त्यांचे  प्रबोधन करेल.

 

लवकरच केंद्र सरकार भारताच्या  संविधानाच्या मूलभूत  तत्त्वांचा प्रचार करण्याच्या प्रयत्नांमध्ये भागीदार होण्याबाबत  तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी  'तुमचे संविधान जाणून घ्या' हा कार्यक्रम राबवेल अशी घोषणा .ठाकूर यांनी केली.

रेड्डी म्हणाले, “चित्रांजली@75 प्रदर्शन लोकांना आपल्या  स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देईल. आपल्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग म्हणून आपल्या चित्रपटांकडे पाहण्याची ही संधी आहे. भारतीय चित्रपटांना भारताची सॉफ्ट पॉवर पुढे नेण्याची  ही अनोखी संधी आहे. मला खात्री आहे की फोटो आणि पोस्टर प्रदर्शन देशातील तरुणांना प्रेरणा आणि ऊर्जा देईल.”

माहिती व प्रसार मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले की, हा कार्यक्रम आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा देशातील तरुणांपर्यंत नेण्याच्या दिशेने एक प्रयत्न होता.

 

राज्यघटनेच्या निर्मितीबद्दल:

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' चा भाग म्हणून,माहिती आणि प्रसारण मंत्रालय स्वातंत्र्यलढ्याच्या विविध पैलूंवर संपूर्ण वर्षभर ई-पुस्तकांची मालिका सुरू करत आहे. या मालिकेतील पहिले पुस्तक आहे 'संविधान निर्मिती '. त्यानंतर देशाचे एकीकरण , स्वातंत्र्य चळवळीतील महिला, आदिवासी चळवळी, क्रांतिकारी/गांधीवादी चळवळी इ.समावेश आहे.

ई-बुक 'मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन' 25 दुर्मिळ चित्रांद्वारे संविधानाची रचना दर्शवते. यात आकाशवाणी संग्रह आणि चित्रपट विभागातून मिळवलेल्या व्हिडीओ आणि भाषणांच्या लिंक्स  आहेत

फिल्म्स डिव्हिजनकडून मिळवलेल्या व्हिडीओ आणि भाषणांच्या लिंक देखील यात आहेत.

ई-बुकमध्ये अतिरिक्त परस्परसंवादी/ सहभागात्मक  प्रश्नमंजुषा आहेत,  ज्यात 10 प्रश्नांचा संच आहे , जो  वाचकांचा सहभाग वाढवेल  आणि नागरिकांची 'जनभागीदारी " सुनिश्चित करेल.

हे ई-बुक हिंदी आणि इंग्रजी आणि इतर 11 भाषांमध्ये (ओडिया, गुजराती, मराठी, आसामी, तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, बंगाली, उर्दू) उपलब्ध असेल. स्थानिक विद्यापीठे, महाविद्यालये, शाळांना प्रादेशिक पीआयबी/आरओबी कार्यालयांद्वारे या लिंक त्यांच्या संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील.

ई-कॉम्पेंडियम https://constitution-of-india.in/ वर उपलब्ध आहे

आभासी प्रदर्शनाविषयी माहिती :

‘चित्रांजली@75’, प्रदर्शनात, 75 फिल्म पोस्टर्स तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून भारतातल्या विविध भाषांमधील चित्रपटातले देशभक्तीचे विविध रंग दाखवण्यात आले आहेत. हे प्रदर्शन तीन भागात विभागण्यात आले आहे. “सिनेमाच्या कॅमेरा नेत्रातून स्वातंत्र्यलढा’, ‘सामाजिक सुधारणांविषयीचे चित्रपट’ आणि ‘वीर सैनिकांना सलाम’ असे हे तीन विभाग आहेत.

‘सिनेमाच्या कॅमेरा नेत्रातून स्वातंत्र्यलढा’- या विभागात, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या रोमहर्षक कथा विविध भाषांमधील चित्रपटातून दाखवण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यसेनानींचे शौर्य आणि त्याग याला चित्रपटातून सर्वसामान्यांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोचवण्यात आले आहे आणि या वीरगाथा पुढेही अनेक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या ठरतील.

दृश्य दस्तऐवजांचा पॅनोरामा असलेल्या या ऑनलाईन प्रदर्शनात, देशालां स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या 75 वर्षांतील ठळक घटनांचा मागोवा घेण्यात आला आहे. या डिजिटल संग्रहात, भारतीय चित्रपटातून, देशाच्या स्वातंत्र्यसेनानींचे आणि आपल्या वीर सैनिकांचे शौर्य आणि बलिदानाच्या गाथांचे गौरवगान चित्रित केलेले आहे. या प्रदर्शनात, अशा चित्रपटांचीही झलक आहे, ज्यातून हाताळण्यात आलेल्या सामाजिक प्रश्नांचा जनमानसावर परिणाम झाला आणि त्यातून सामाजिक सुधारणांचा मार्ग मोकळा झाला. तसेच, आपल्या सैनिकी गणवेशातले आपले नायक- आपल्या जवानांच्या शौर्यगाथांची झलक या प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळेल.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘आयकॉनिक विक ऑफ आझादी का अमृत महोत्सव’ या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, भारतीय सिनेमा ही देशाची सॉफ्ट पॉवर असून जागतिक व्यासपीठावर भारताची ओळख निर्माण करण्यात या चित्रपटसृष्टीचे योगदान महत्वाचे आहे.

आभासी प्रदर्शनाविषयी माहिती :

‘चित्रांजली@75’, प्रदर्शनात, 75 फिल्म पोस्टर्स तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून भारतातल्या विविध भाषांमधील चित्रपटातले देशभक्तीचे विविध रंग दाखवण्यात आले आहेत. हे प्रदर्शन तीन भागात विभागण्यात आले आहे. “सिनेमाच्या कॅमेरा नेत्रातून स्वातंत्र्यलढा’, ‘सामाजिक सुधारणांविषयीचे चित्रपट’ आणि ‘वीर सैनिकांना सलाम’ असे हे तीन विभाग आहेत.

‘सिनेमाच्या कॅमेरा नेत्रातून स्वातंत्र्यलढा’- या विभागात, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या रोमहर्षक कथा विविध भाषांमधील चित्रपटातून दाखवण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यसेनानींचे शौर्य आणि त्याग याला चित्रपटातून सर्वसामान्यांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोचवण्यात आले आहे आणि या वीरगाथा पुढेही अनेक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या ठरतील.

‘‘सामाजिक सुधारणांविषयीचे चित्रपट’’- या विभागात, भारतीय चित्रपट आणि विसाव्या शतकातील सुरुवातीच्या दशकातला राष्ट्रीय स्वातंत्र्यलढा यांच्यातील परस्परसबंध दर्शवण्यात आला आहे. जनशक्तीला एकत्रित आणण्याची चित्रपटांची ताकद यात आपल्याला अनुभवता येते. प्रत्ययकारी दृश्यांच्या आणि गीतांच्या माध्यमातून लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे देखील सिनेमाच्या माध्यमातून करता येते. अनेक सामाजिक सुधारणांच्या चळवळी देखील या चित्रपटांतून दाखवण्यात आल्या आहेत. त्या काळात झालेल्या या चळवळीवरच्या चित्रपटांमुळे समाजात आलेली मरगळ दूर होऊन नवे चैतन्य निर्माण झाले होते.

To view virtual exhibition Click Here:

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1749646) Visitor Counter : 307