पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 12 ऑगस्टला ‘आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद’ कार्यक्रमात सहभागी होणार
Posted On:
11 AUG 2021 3:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑगस्टला ‘आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद’ या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत प्रोत्साहन प्राप्त महिला स्वयं सहाय्यता गट,सामुदायिक विशेषज्ञ व्यक्ती यांच्याशी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधणार आहेत.देशभरातल्या महिला स्वयंसहाय्यता गट सदस्यांच्या यशोगाथा त्याचबरोबर कृषी उपजीविका सार्वत्रीकरण यावरच्या एका पुस्तीकेचेही प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
4 लाखाहून अधिक स्वयं सहाय्यता गटांना 1,625 कोटी रुपयांचा भांडवली सहाय्य निधीही पंतप्रधान जारी करतील. याशिवाय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या, पीएम सूक्ष्म अन्न प्रक्रिया आस्थापना औपचारीकीकरण योजने अंतर्गत,7,500 स्वयं सहाय्यता गट सदस्यांना बीज रक्कम म्हणून 25 कोटी रुपयेही पंतप्रधान जारी करणार आहेत. तसेच अभियानांतर्गत प्रोत्साहन देण्यात येणाऱ्या 75 एफ पी ओ म्हणजेच कृषी प्रक्रिया संस्थांसाठी 4.13 कोटी निधीही पंतप्रधान जारी करतील.
केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस, ग्रामीण विकास राज्य मंत्री साध्वी निरंजन ज्योती, फग्गन सिंह कुलस्ते, पंचायती राज राज्य मंत्री कपिल मोरेश्वर पाटील आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, यावेळी उपस्थित असतील.
दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाविषयी-
ग्रामीण भागातल्या गरीब कुटुंबाना टप्याटप्याने स्वयं सहाय्यता गटांना चालना देऊन उपजीविका साधनात वैविध्य आणून त्यांच्या जीवनमानात आणि उत्पन्नात दीर्घकालीन सुधारणा करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. अभियाना अंतर्गत असलेले बरेचसे उपक्रम महिला स्वयं सहाय्यता गटाकडून राबवण्यात येत असून त्यांना कम्युनिटी रिसोर्स पर्सन म्हणून म्हणजेच समुदाय विशेषज्ञ व्यक्ती म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. कृषी सखी, पशु सखी, बँक सखी, विमा सखी, बँकिंग संवाद सखी यांच्या द्वारेही हे उपक्रम राबवले जातात. कौटुंबिक हिंसाचार, महिला शिक्षण, पोषण,स्वच्छता आरोग्य यासारख्या बाबीवर जागृती निर्माण करून आणि वर्तनात्मक बदलासाठी संवाद याद्वारे स्वयं सहाय्यता गटांना सबल करण्याच्या दिशेनेही हे अभियान काम करत आहे.
Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1744788)
Visitor Counter : 312
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam