आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 50.86 कोटींचा टप्पा
भारताने 97.40 % हा रुग्ण बरे होण्याचा सर्वाधिक दर गाठला
गेल्या 24 तासात 35,499 नव्या रुग्णांची नोंद
भारतातील सक्रीय रुग्णसंख्या (4,02,188) सध्या एकूण रुग्णसंख्येच्या केवळ 1.26%
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर (2.59%), गेल्या 14 दिवसांपासून 3% पेक्षा कमी
Posted On:
09 AUG 2021 10:15AM by PIB Mumbai
भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 50.86 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार एकूण 58,79,068 सत्रांमध्ये, 50,86,64,759 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 16,11,590 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
यामध्ये :
HCWs
|
1st Dose
|
1,03,32,881
|
2nd Dose
|
79,82,037
|
FLWs
|
1st Dose
|
1,82,17,136
|
2nd Dose
|
1,17,58,909
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
17,67,66,853
|
2nd Dose
|
1,20,24,776
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
11,18,71,679
|
2nd Dose
|
4,26,95,084
|
Over 60 years
|
1st Dose
|
7,84,79,044
|
2nd Dose
|
3,85,36,360
|
Total
|
50,86,64,759
|
कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.
आणखी एका सकारात्मक घडामोडीत, भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर गेल्या 24 तासांमध्ये 97.40% वर पोहोचला आहे. महामारीची सुरुवात झाल्यापासून भारताने साध्य केलेला हा आतापर्यंतचा सर्वोच्च दर आहे.
भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 3,11,39,457 तर गेल्या 24 तासात 39,686 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत.
भारतात गेल्या 24 तासात 35,499 नव्या रुग्णांची नोंद झाली.
सलग 43 दिवस 50,000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे.
देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 4,02,188 इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या 1.26% आहे.
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 13,71,871 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 48 कोटींपेक्षा अधिक (48,17,67,232) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दर सध्या 2.35 % तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.59 % आहे. गेल्या 14 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 3% पेक्षा कमी तर सलग 63 दिवस 5% पेक्षा कमी आहे.
***
UmeshU/SushmaK/DY
Follow us on social media: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1743955)
Visitor Counter : 262