पंतप्रधान कार्यालय
तेलंगणातील नागरकुर्नूल येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून केली मदत घोषित
Posted On:
23 JUL 2021 9:59PM by PIB Mumbai
तेलंगणातील नागरकुर्नूल येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत ही पंतप्रधानांनी घोषित केली आहे.
पंतप्रधान कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणतात, "तेलंगणामध्ये नागरकुर्नूल येथील अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी व्यक्तींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून करण्यात येईल.- पंतप्रधान मोदी."
***
Jaydevi PS/JW/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1738476)
Visitor Counter : 192
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam