पंतप्रधान कार्यालय
राज्यसभेत नवीन मंत्र्यांचा परिचय करून देताना पंतप्रधानांचे संबोधन
Posted On:
19 JUL 2021 4:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2021
आदरणीय सभापती ,
तुम्ही मला मंत्रिमंडळातील नव्या सदस्यांचा या सभागृहात परिचय करून द्यायला सांगितले आहे.
आज सभागृहात एक अशी संधी आली आहे, ज्यात देशातील खेड्यातील पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबातील मुले आज मंत्री बनले असून या सन्माननीय सभागृहात त्यांची ओळख करून दिली जात आहे तर काही लोकांना खूप त्रास होत आहे.
आज या सभागृहात ज्या महिला मंत्री बनल्या आहेत , त्यांचा परिचय करून दिला जात आहे. अशी कुठली महिला विरोधी मानसिकता आहे ज्यामुळे या सभागृहात त्यांचे नाव ऐकायला कुणी तयार नाही, त्यांचा परिचय करून घ्यायला देखील तयार नाहीत.
माननीय सभापती ,
अनुसूचित जमातीतील खासदार मोठ्या संख्येने मंत्री बनले आहेत. आपल्या आदिवासी मंत्र्यांप्रती अशी रागयुक्त भावना का आहे , ज्यामुळे आदिवासी मंत्र्यांची या सन्माननीय सभागृहात ओळख करून दिली जात आहे हे देखील त्यांना पसंत नाही.
माननीय सभापती,
या सभागृहात मोठ्या संख्येने दलित मंत्र्यांचा परिचय करून दिला जात आहे. दलित समाजाच्या प्रतिनिधींचे नाव ऐकायला हे तयार नाहीत. ही कुठली मानसिकता आहे, जी दलितांचा गौरव करायला तयार नाही, आदिवासींचा गौरव करायला तयार नाही, शेतकऱ्याच्या गौरव करायला तयार नाही, ही कुठली मानसिकता आहे, जी महिलांचा गौरव करायला तयार नाही . अशा प्रकारची विकृत मानसिकता प्रथमच या सभागृहाने पाहिली आहे.
आणि म्हणूनच माननीय सभापती ,
तुम्ही परिचय करून देण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मात्र माननीय सभापती महोदय, मंत्रिमंडळातल्या नवनियुक्त सदस्यांचा राज्यसभेत परिचय झाला आहे असे समजले जावे.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736784)
Read this release in:
Hindi
,
English
,
Urdu
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam