पंतप्रधान कार्यालय

नंदुरबार येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांप्रती पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त


सानुग्रह मदत केली जाहीर

Posted On: 18 JUL 2021 11:23PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, महाराष्ट्रातील , नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अपघातात काही नागरिक मृत्युमुखी पडल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. PMNRF अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची सानुग्रह मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.

आपल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले:

महाराष्ट्रातील नंदुरबार येथून एका दुर्घटनेबाबत अत्यंत दुखःद बातमी आली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबाबत मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होण्यासाठी मी प्रार्थना करतो.  पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची सानुग्रह मदत देण्यात येईल: PM @narendramodi


*** 

Jaydevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1736693) Visitor Counter : 131