ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना - IV अंतर्गत वितरणासाठी 31 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 15.30 एलएमटी मोफत धान्य उचलले

पीएमजीकेवाय-III अंतर्गत सर्व 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 78.26 एलएमटी मोफत धान्य उचलले

धान्याचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एफसीआय देशभरातील सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अन्नधान्याची वाहतूक करत आहे

एफसीआयने 1 एप्रिल 2021 पासून 4005 अन्नधान्य रेक लोड केले आहेत

Posted On: 13 JUL 2021 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 जुलै 2021

 

अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोविड -19 महामारीच्या काळात केंद्र सरकार लोकांना मोफत अन्नधान्य वितरित करण्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा उपक्रम राबवत आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 5 महिन्यांसाठी म्हणजे जुलै ते नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे आणि पीएमजीकेवाय-IV  (जुलै-नोव्हेंबर 2021) अंतर्गत 198.79 एलएमटी अन्नधान्याचे वाटप केले आहे.

पीएमजीकेवाय --IV (जुलै-नोव्हेंबर 2021) अंतर्गत 31 राज्ये म्हणजेच आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार , अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा आणि नगर  हवेली/दमण आणि दीव, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, लडाख, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिशा, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल यांनी उचल सुरु केली आहे आणि 12 जुलै 2021 पर्यंत15.30 एलएमटी अन्नधान्य उचलले आहे.

पीएमजीकेवाय--IV च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारतीय खाद्य महामंडळाने यापूर्वीच सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरेसा साठा ठेवला आहे. सध्या, केंद्रीय साठा अंतर्गत 583 एलएमटी गहू आणि 298 एलएमटी तांदूळ (एकूण 881 एलएमटी धान्य) उपलब्ध आहे.

पीएमजीकेए -III (मे-जून 2021) अंतर्गत भारतीय खाद्य महामंडळाने सर्व 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 78.26 एलएमटी मोफत अन्नधान्य पुरवठा केला आहे.

सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अन्नधान्याचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी एफसीआय देशभर धान्य वाहतूक करत आहे. 1 एप्रिल 2021 पासून, एफसीआयने  4005 अन्नधान्य रेक्स लोड केले आहेत.

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1735082) Visitor Counter : 148