पंतप्रधान कार्यालय
परम पावन मोरान मार बॅसेलीयोस मारथोमा पाओलोस द्वितीय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
12 JUL 2021 11:45AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, इंडियन ऑर्थोडॉक्स चर्चचे सर्वोच्च प्रमुख परम पावन मोरान मार बॅसेलीयोस मारथोमा पाओलोस द्वितीय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
इंडियन ऑर्थोडॉक्स चर्चचे सर्वोच्च प्रमुख परम पावन मोरान मार बॅसेलीयोस मारथोमा पाओलोस द्वितीय यांच्या निधनाने दुःख झाले. सेवा आणि करुणा यांचा समृद्ध वारसा त्यांनी ठेवला आहे. दुःखाच्या या प्रसंगी ऑर्थोडॉक्स चर्चच्या सदस्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटर वर म्हटले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.
* * *
Jaydevi PS/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1734733)
आगंतुक पटल : 239
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada