आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण: गैरसमज आणि वस्तुस्थिती


जुलै महिन्यात उपलब्ध करुन दिल्या जात असलेल्या लसींच्या मात्रांबद्दल राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पुरेशी आगाऊ माहिती देण्यात आली आहे

जुलैमध्ये राज्य / केंद्रशासित प्रदेशांना 12 कोटीहून अधिक लसींच्या मात्रा मिळणार

Posted On: 07 JUL 2021 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जुलै 2021


अलिकडेच माध्यमांमध्ये प्रसिद्ध वृत्तात आरोप करण्यात आला होता कीं गेल्या  आठवड्यात त्यापूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत 32% कमी लसीकरण झाले होते.

हे स्पष्ट करण्यात आले आहे की सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना जुलै 2021  महिन्यात उपलब्ध करुन दिल्या जात असलेल्या लसींच्या मात्रांबद्दल तसेच खासगी रुग्णालयांना केल्या जात असलेल्या पुरवठ्याबद्दल आगाऊ माहिती दिली जाते. कोविड लसींच्या उपलब्धतेनुसार राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या कोविड  -19 लसीकरण सत्रांचे नियोजन करावे अशी सूचना करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने उत्पादकांबरोबर झालेल्या चर्चेच्या आधारे, सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना कळवले होते की त्यांना जुलै 2021 महिन्यात कोविड प्रतिबंधक लसींच्या 12 कोटीहून अधिक मात्रा मिळतील. आज सकाळपर्यंत 2.19  कोटीहून अधिक  मात्रा जुलैच्या पुरवठ्यामधून  सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आल्या आहेत. कोविड प्रतिबंधक लसींच्या पुरवठ्याबाबत राज्यांना पुरेसे अगोदर कळवण्यात येत  आहे. 

तसेच सर्व राज्यांना देखील विनंती केली आहे की वाढती लसीकरण व्याप्ती लक्षात घेऊन अधिक प्रमाणात लसींच्या मात्राची आवश्यकता भासल्यास त्यांनी संभाव्य  मागणी सामायिक करावी.

 

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1733405) Visitor Counter : 285