आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड लसीकरण: गैरसमज विरुद्ध तथ्य
राज्य / केंद्रशासित प्रदेशांना जुलै महिन्यात त्यांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या लसींच्या मात्रांबाबत पुरेशी माहिती आगाऊ देण्यात आली होती
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या अधिक मात्रा हव्या असल्यास, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सूचित करण्याची सूचना करण्यात आली आहे
प्रविष्टि तिथि:
06 JUL 2021 7:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2021
मागील दोन दिवसात राजस्थानमध्ये कोविड 19 लसीचा तुटवडा असल्यामुळे काही कोविड लसीकरण केंद्र बंद करावी लागली असा आरोप माध्यमातील काही वृत्तात करण्यात आला आहे.
हे स्पष्ट करण्यात येत आहे की जुलै 2021 च्या महिन्यात राज्यांना / केंद्रशासित प्रदेशांना तसेच खासगी क्षेत्रातील रुग्णालयांना देण्यात येणाऱ्या लसींच्या एकूण मात्रांबाबत पुरेशी माहिती अगोदरच देण्यात आली होती. कोविड लसींच्या उपलब्धतेनुसार कोविड 19 लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याची सूचना राज्यांना करण्यात आली होती.
1 जुलै 2021, रोजी राजस्थानात लसींच्या 1.69 लाखांहून अधिक मात्राचा साठा वापराविना पडून होता. राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत, केंद्र सरकारकडून 1 ते 6 जुलै 2021 या कालावधीत राज्याला 8.89 लाखाहून अधिक लसीच्या मात्रा मोफत प्राप्त झाल्या आहेत. याव्यतिरिक्त, राजस्थानला जुलै 2021 च्या उर्वरित दिवसात अतिरिक्त 39 लाख 51 हजार मात्रा मिळतील. जुलै 2021 च्या संपूर्ण महिन्यात राजस्थानला 50 लाख 90 हजारांहून अधिक लसीच्या मात्रा मिळणार आहेत. लसींचे उत्पादन आणि उपलब्धतेनुसार ही संख्या आणखी वाढू शकते. याव्यतिरिक्त, राज्यांना देखील कोविड लसीच्या अधिक मात्रांची आवश्यकता भासल्यास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला सूचित करण्याची विनंती करण्यात आली आहे.
लस एक जैविक उत्पादन असल्यामुळे उत्पादनाच्या प्रक्रियेस वेळ लागतो. एकदा उत्पादन झाल्यावर या लसींची गुणवत्ता व सुरक्षिततेची तपासणी केली जाते. अशा प्रकारे, लस तयार करण्यासाठी उत्पादन प्रक्रिया वेळ घेते , त्यामुळे त्वरित पुरवठा शक्य होत नाही.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1733168)
आगंतुक पटल : 287