पंतप्रधान कार्यालय

अमली पदार्थ आणि तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश

Posted On: 26 JUN 2021 11:24AM by PIB Mumbai

आपल्या समाजातून अंमली पदार्थांचा धोका हद्दपार व्हावा यासाठी तळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या सर्वांची आपण  प्रशंसा करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमली पदार्थ आणि तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले आहे. अशा प्रकारे आयुष्य वाचवण्याचा प्रत्येक प्रयत्न महत्वाचा आहे. अंमली पदार्थ आपल्याबरोबर अंधःकार आणि विनाश घेऊन येतात.

अंमली पदार्थाबाबत #ShareFactsOnDrugs प्रती आपल्या कटीबद्धतेचा पुनरुच्चार करून अंमली पदार्थ मुक्त भारत साकारुया. व्यसन कधीच चांगलं नसतं आणि व्यसन म्हणजे स्टाईल नव्हे याचा विसर पडता कामा नये. अंमली पदार्थांच्या धोक्यावर मात करणाऱ्या विविध पैलूंचा समावेश असलेला या पूर्वीचा  ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा एक भाग सामायिक करत आहे.  

 

***

STupe/NChitale/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1730480) Visitor Counter : 202