आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात गेल्या 24 तासात 60,753 दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद
भारतात उपचाराधीन रुग्णसंख्येत घट होऊन ही संख्या 7,60,019 इतकी झाली आहे, 74 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या
दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा, दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या, सलग 37 व्या दिवशी जास्त
रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढून 96.16%
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.98%, सलग 12 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा कमी
Posted On:
19 JUN 2021 10:15AM by PIB Mumbai
भारतात उपचाराधीन दैनंदिन नव्या रुग्णसंख्येत सातत्याने घट झाल्याची नोंद झाली आहे. भारतात गेल्या 24 तासात 60,753 दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
आता सलग 12 व्या दिवशी 1 लाखांपेक्षा कमी दैनंदिन नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. केंद्र सरकार सहित राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सरकारांच्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांमुळे हे साध्य झाले आहे.
भारतात सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत सतत घसरण दिसून येत आहे. देशातील सक्रीय कोविड रुग्णांची संख्या आज 7,60,019 आहे. सक्रिय रुग्णांची गेल्या 74 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे.
गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्येत एकूण 38,637 ने घट झाली आणि देशातील सध्याची सक्रीय रुग्णसंख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 2.55% इतकी आहे.
देशातील अधिकाधिक लोक कोविड-19 आजारातून बरे होत असल्यामुळे देशात दैनंदिन पातळीवर नव्याने रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या आता सलग 37 व्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासांत 97,743 रुग्ण कोविडमुक्त झाले असल्याची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत दैनंदिन पातळीवर नव्याने रुग्णांच्या तुलनेत 37 हजारांहून अधिक (36,990) व्यक्ती कोविडमुक्त झाल्या.
महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोना आजार झालेल्यांपैकी 2,86,78,390 व्यक्ती कोविड -19 मधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 97,743 रुग्ण रोगमुक्त झाले आहेत त्यामुळे आता एकूण रोगमुक्ती दर 96.16%, झाला असून या दरात सतत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
देशभरात कोविड चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढविण्यात येत असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 19,02,009 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकूण 38 कोटी 92 लाखांहून अधिक (38,92,07,637) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
एकीकडे देशात चाचण्यांचे प्रमाण वाढविले जात असतानाच दुसरीकडे साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात सतत घसरण दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.58% असून दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.98% इतका आहे. हा दर सलग 12 व्या दिवशी 5% हून कमी राहिला आहे.
भारतात आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या एकूण 27 कोटी 23 लाख मात्रा दिल्या गेल्या आहेत. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, देशात 37,48,147 सत्रांद्वारे कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 27,23,88,783 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 33,00,085 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
***
ST/SP/DY
एचएफडब्ल्यू/राज्य निहाय स्थिती/19 जून 2021/2
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728487)
Visitor Counter : 168
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam