आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात गैरसमज आणि वस्तुस्थिती
लसीच्या एडिनोव्हेक्टर वर्तनाशी संबंधित मूलभूत वैज्ञानिक कारणास्तव कोव्हीशील्ड लसीच्या दोन मात्रांमधील अंतर वाढविण्याचा निर्णय
लसीकरणासंदर्भातील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड- 19 कार्यकारी समूह आणि स्थायी तांत्रिक उपसमिती (एसटीएससी) च्या बैठकीतील कार्यवृत्तांची नोंद स्पष्टपणे दर्शवते की, कोव्हीशील्ड लसीच्या दोन मात्रांमधील अंतर 12-16 आठवड्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय कोणत्याही सदस्याच्या मतभेदाशिवाय एकमताने घेण्यात आला
Posted On:
16 JUN 2021 3:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2021
कोरोना प्रतिबंधक कोव्हीशील्ड या लसीच्या दोन मात्रांमधील अंतर 6-8 आठवड्यांपासून ते 12-16 आठवड्यांपर्यंत वाढवल्यासंदर्भात काही प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाली आहेत, ही वृत्ते या निर्णयासंदर्भात तांत्रिक तज्ज्ञांचे आपापसात मतभेद असल्याचे सूचित करतात.
हे लक्षात घ्यायला हवे की, दोन मात्रांमधील अंतर वाढविण्याचा निर्णय लसीच्या एडिनोव्हेक्टर वर्तनाशी संबंधित वैज्ञानिक कारणास्तव घेण्यात आला आहे आणि लसीकरणासंदर्भातील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचा कोविड- 19 कार्यकारी समूह आणि स्थायी तांत्रिक उपसमिती (एसटीएससी) च्या बैठकांमध्ये यासंदर्भात सखोल चर्चा झाली आणि कोणत्याही सदस्यांनी या निर्णयाबाबत मतभेद दर्शविले नाहीत.
लसीकरणासंदर्भातील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (एनटीएटीआय) कोविड- 19 कार्यकारी गटाची ची 22 वी बैठक 10 मे 2021 रोजी झाली.कोविड- 19 कार्यकारी गटात खालील सदस्य आहेत:
Dr. N K Arora
|
Executive Director, INCLEN
|
Dr. Rakesh Aggarwal
|
NTAGI Member, Director, JIPMER, Puducherry
|
Dr. Gagandeep Kang
|
NTAGI Member, Professor, CMC Vellore
|
Dr. Amulya Panda
|
NTAGI Member, Director, NII
|
Dr. J P Muliyil
|
NTAGI Member, Retd. Principal, CMC, Vellore
|
Dr. Navin Khanna
|
Group Leader, ICGEB
|
Dr. V G Somani
|
DCGI, CDSCO
|
Dr. Pradeep Haldar
|
Advisor, RCH, MoHFW
|
या कोविड -19 कार्यकारी गटाने राष्ट्रीय लसीकरण धोरणांतर्गत वापरल्या जाणार्या कोव्हीशील्ड या लसीच्या मात्रांच्या अंतरामध्ये बदल करण्याच्या प्रस्तावावर विचार केला.अशी शिफारस करण्यात आली की, ‘विशेषकरून युनायटेड किंगडम (यूके) कडून वास्तववादी पुराव्यांच्या आधारे, कोविड-19 कार्यकारी गटाने कोव्हीशील्ड लसीच्या दोन मात्रांमधील अंतर 12-16 आठवड्यांपर्यंत वाढवण्यास सहमती दर्शविली'.
कोविड -19 कार्यकारी गटाची ही शिफारस लसीकरणासंदर्भातील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या स्थायी तांत्रिक उपसमितीच्या (एसटीएससी) 31 व्या बैठकीत चर्चेसाठी घेण्यात आली. ही बैठकी 13 मे 2021 रोजी जैव तंत्रज्ञान विभाग आणि आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या महासंचालकांचा संयुक्त अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
स्थायी तांत्रिक उपसमितीचे सदस्य खालीलप्रमाणे आहेत.
Dr. Renu Swarup
|
Secretary, Department of Biotechnology
|
Dr. Balram Bhargava
|
Secretary, Department of Health Research & DG- ICMR
|
Dr. J P Muliyil
|
Professor, CMC Vellore
|
Dr. Gagandeep Kang
|
Professor, CMC Vellore
|
Dr. Indrani Gupta
|
Professor, Institute for Economic Growth, Delhi
|
Dr. Rakesh Aggarwal
|
Director, JIPMER, Puducherry
|
Dr. Mathew Varghese
|
Head of the Dept, Orthopaedics, St. Stephan’s Hospital, New Delhi
|
Dr. Satinder Aneja
|
Professor, Sharda University, Noida
|
Dr. Neerja Bhatla
|
Professor, AIIMS, New Delhi
|
Dr. M D Gupte
|
Former Director, NIE, Chennai
|
Dr. Y K Gupta
|
Principal Adviser THSTI-DBT
|
Dr. Arun Aggarwal
|
Professor, PGIMER, Chandigarh
|
Dr. Lalit Dhar
|
Professor, Virology, AIIMS, New Delhi
|
लसीकरणासंदर्भातील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या स्थायी तांत्रिक उपसमितीने पुढील शिफारस केली: कोविड-19 कार्यकारी गटाच्या शिफारसीनुसार, कोव्हीशील्ड लसीच्या दोन मात्रांमधील अंतर किमान तीन महिने ठेवावे अशी शिफारस करण्यात आली.
दोन्ही बैठकांमध्ये म्हणजेच कोविड 19 कार्यकारी गट आणि तांत्रिक उपसमितीच्या बैठकीमध्ये डॉ. मॅथ्यू वर्गीस, डॉ. एम. डी. गुप्ते आणि डॉ. जे. पी. मुलीईल या तीन सदस्यांनी मतभेद व्यक्त केल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे, मात्र या निर्णयासंदर्भात या तीन सदस्यांनी कोणतेही मतभेद दर्शविले नाहीत. पुढे डॉ. मॅथ्यू वर्गीस यांनी रॉयटर्सने केलेल्या मतभेदांच्या आरोपांसंदर्भात बोलण्यास नकार दर्शविला आहे.
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727518)
Visitor Counter : 245