आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात गेल्या 24 तासात 70,421 नव्या कोरोना रुग्णांची नोंद,74 दिवसातली सर्वात कमी रुग्णसंख्या


66 दिवसानंतर भारतातली  उपचाराधीन रुग्णसंख्या 10 लाखापेक्षा कमी

महिन्याभराहून जास्त काळ दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची  संख्या जास्त

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.43%

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 4.72%, हा दर 3 आठवडे 10 % पेक्षा कमी

Posted On: 14 JUN 2021 3:53PM by PIB Mumbai

 

भारतात दैनंदिन नव्या रुग्ण संख्येचा घटता कल जारी आहे.गेल्या 24 तासात  देशात 70,421  दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सलग सातव्या दिवशी 1 लाखापेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फलित आहे.

भारतात उपचाराधीन रुग्ण संख्येतही सातत्याने घट होत आहे. देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या आज 9,73,158 आहे. 66 दिवसानंतर भारतातली  उपचाराधीन रुग्णसंख्या 10 लाखापेक्षा कमी आहे.

गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्णसंख्येत 53,001 ने घट झाली असून उपचाराधीन रुग्ण, देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या  3.30% आहेत.

कोविड-19 संसर्गातून मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची  संख्या सलग 32 व्या दिवशीही जास्त आहे. गेल्या 24 तासात 1,19,501 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

गेल्या 24 तासात दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत, बरे होणाऱ्यांची  संख्या सुमारे 50,000 (49,080) ने अधिक होती.

महामारीच्या सुरवातीपासूनच्या कोरोना बाधितामधून  2,81,62,947 लोक कोरोनातून बरे झाले असून गेल्या 24 तासात 1,19,501 रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा  दर  उंचावत असून हा दर  95.43%, झाला आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असून गेल्या 24 तासात 14,92,152 चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत  सुमारे 38 कोटी(37,96,24,626) चाचण्या केल्या आहेत. 

देशभरात चाचण्या  वाढवत  असतानाच साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दरामध्ये  सातत्याने घट होत आहे. साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 4.54% असून दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर आज 4.72%  आहे. सलग 21  व्या दिवशी हा दर 10 % पेक्षा कमी आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार 35,32,375 सत्राद्वारे कोरोना प्रतिबंधक लसीच्या एकूण  25,48,49,301 मात्रा देण्यात आल्या.

 

These include:

HCWs

1st Dose

1,00,51,785

2nd Dose

69,67,822

FLWs

1st Dose

1,67,57,575

2nd Dose

88,52,564

Age Group 18-44 years

1st Dose

4,12,71,166

2nd Dose

7,69,575

Age Group 45 to 60 years

1st Dose

7,57,08,102

2nd Dose

1,19,77,000

Over 60 years

1st Dose

6,25,81,044

2nd Dose

1,99,12,668

Total

25,48,49,301


***

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1726967) Visitor Counter : 202