रसायन आणि खते मंत्रालय
अॅम्फोटेरिसिन बी या औषधाच्या अतिरिक्त 1,06,300 कुप्या सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्रीय संस्थांना वितरित – केंद्रीय मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा
कन्व्हेंशनल अम्फोटेरिसिन-बी औषधाच्या एकूण 53,000 कुप्याही वितरित
Posted On:
14 JUN 2021 1:44PM by PIB Mumbai
लीपोसोमल अम्फोटेरिसिन-बी या औषधाच्या अतिरिक्त 1,06,300 वायल्स सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्रीय संस्थांना आज वितरित करण्यात आल्या आहेत, असे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी ट्विटरवरून जाहीर केले आहे.
कन्व्हेंशनल अम्फोटेरिसिन-बी औषधाच्याही एकूण 53,000 वायल्स सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना वितरित करण्यात आल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.
कन्व्हेंशनल अम्फोटेरिसिन-बी औषधाचा सुरळीत पुरवठा व्हावा आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळत रहावेत म्हणून कन्व्हेंशनल अम्फोटेरिसिन-बी औषधाचे वितरण करण्यात आल्याचे ते म्हणाले.
***
S.Tupe/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1726949)
Visitor Counter : 164
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam