पंतप्रधान कार्यालय

नामवंत मेंदूविकारतज्ज्ञ डॉ.अशोक पनगारिया यांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधानांकडून शोकभावना व्यक्त

प्रविष्टि तिथि: 11 JUN 2021 6:22PM by PIB Mumbai

 

नामवंत मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. अशोक पनगारिया यांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.

ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणतात, "डॉ.अशोक पनगारिया यांनी एक यशस्वी मेंदूविकारतज्ज्ञ म्हणून कीर्ती संपादन केली होती. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी अग्रणी राहून केलेले कार्य, डॉक्टर्स आणि संशोधकांच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. त्यांच्या निधनाने मी अतिशय दुःखी झालो आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रपरिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शांतिः ।"

***

M.Chopade/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1726309) आगंतुक पटल : 207
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam