आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात सलग तिसऱ्या दिवशी 1 लाखापेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद.
देशातील सक्रीय रुग्णसंख्या 60 दिवसांनंतर 12 लाखांपेक्षाही (11,67,952) कमी
सलग 28 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक.
बरे होण्याचा दर वाढून 94.77%
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 4.69%, सलग 17 व्या दिवशी 10% पेक्षा कमी.
भारतातील लसीकरणाने पार केला 24 कोटींचा टप्पा.
प्रविष्टि तिथि:
10 JUN 2021 10:28AM by PIB Mumbai
भारतात गेल्या चोवीस तासात 94,052 नव्या रुग्णांची नोंद. देशात सलग तिसऱ्या दिवशी 1 लाखापेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. केन्द्र सरकार, राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

भारतात सक्रिय रूग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे. देशातील सक्रीय रुग्णसंख्या सध्या 11,67,952 आहे. सलग 10 व्या दिवशी ती वीस लाखांपेक्षा कमी आहे.
गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत एकूण 63,463 ने घट झाली आणि देशाच्या एकूण सक्रीय रुग्णसंख्येच्या ती केवळ 4% इतकी आहे.

कोविड संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत आहेत. देशात सलग 28 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात 1,51,367 रुग्ण बरे झाले. दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत 57,315 आणखी रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले.

महामारीच्या सुरुवातीपासून कोविड-19 संसर्ग झालेल्यांपैकी 2,76,55,493 जण आधीच बरे झाले आहेत. तर गेल्या 24 तासात 1,51,367 रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचा कल वाढता असून बरे होण्याचा एकूण दर 94.77% वर पोहचला आहे.

देशात चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ कायम असून गेल्या 24 तासात एकूण 20,04,690 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 37.21 कोटींपेक्षा अधिक (37,21,98,253) चाचण्या करण्यात आल्या.
देशभरात एकीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढत आहे त्याचवेळी साप्ताहिक पॉझिटीव्हीटीमधे घसरणीचा कल कायम आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 5.43% तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 4.69% आहे. सलग 17 व्या दिवशी तो 10% पेक्षा कमी आहे.

देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत गेल्या 24 तासात लसीकरणाने 24 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासात 33,79,261 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
सात वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार, 33,82,775 सत्रांमध्ये, एकूण 24,27,26,693 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
***
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1725886)
आगंतुक पटल : 262
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam