पंतप्रधान कार्यालय

पश्चिम बंगालच्या काही भागांत वीज कोसळल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, मदत जाहीर

प्रविष्टि तिथि: 07 JUN 2021 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जून 2021

 

पश्चिम बंगालच्या काही भागांत वीज कोसळल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

"पश्चिम बंगालच्या काही भागांत वीज कोसळल्याने जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि परिजनांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी व्यक्तींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो." असे पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे व्यक्त केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 

 

 

यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून' दोन लाख रुपये तर जखमी व्यक्तींना प्रत्येकी 50,000 रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

 

 

 

* * *

M.Chopade/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1725208) आगंतुक पटल : 173
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam