आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविन 2.0 मंचावर नोंदणी करण्यासाठी फोटो ओळखपत्र म्हणून आता विशिष्ट दिव्यांगत्व ओळखपत्र स्वीकारले जाईल असे केंद्र सरकारने राज्यांना सांगितले


लसीकरण प्रक्रियेचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकार या प्रक्रियेचे सुव्यवस्थित परिचालन करण्याचा सतत प्रयत्न करीत आहे

Posted On: 07 JUN 2021 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जून 2021

 

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे सुरळीत आणि परिणामकारक कार्यान्वयन सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार यावर्षी 16 जानेवारी पासून “संपूर्णतः सरकार” संकल्पनेच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या प्रयत्नांना पाठींबा देत आहे. देशभरातील विविध श्रेणींमधील लाभार्थ्यांच्या लसीकरणाची प्रक्रिया सुव्यवस्थित पद्धतीने राबविण्यासाठी केंद्र सरकारने कोविन डिजिटल मंचाची स्थापना केली आहे. कोविड प्रतिबंधक लसीची वितरण प्रक्रिया परिणामकारक पद्धतीने तसेच वेगवान स्वरुपात सुरु राहण्यासाठीच्या यंत्रणेला तंत्रज्ञानाचा कणा पुरविण्याचे काम कोविन मंच करतो.

लसीकरण प्रक्रियेचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकार या प्रक्रियेचे सुव्यवस्थित परिचालन करण्याचा सतत प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर, कोविन 2.0 या मंचावर लसीकरणासाठी नोंदणी करताना आवश्यक असणाऱ्या फोटो ओळखपत्रांच्या यादीत UDID अर्थात विशिष्ट दिव्यांगत्व ओळखपत्राचा समावेश करावा असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना लिहिलेल्या पत्राद्वारे सांगितले आहे. कोविन 2.0 मंचाच्या परिचालनासाठी 2 मार्च 2021 ला जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये लसीकरणाआधी लाभार्थ्याच्या ओळख निश्चितीची पडताळणी करण्यासाठी ठराविक 7 प्रकारची फोटो ओळखपत्रे निश्चित करून लस घेण्याआधी सादर करणे अनिवार्य होते. 

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाने दिव्यांग व्यक्तींना दिलेल्या UDID मध्ये व्यक्तीचे नाव, जन्मवर्ष, लिंग आणि फोटो असे सर्व आवश्यक तपशील अंतर्भूत असतात आणि कोविड-19 लसीकरणाच्या वेळी ओळख पटविण्यासाठीच्या निकषांची ते पूर्तता करतात.

म्हणून, दिव्यांग व्यक्तींसाठी लस घेण्याची सुविधा अधिक  सुलभ करण्याच्या दृष्टीकोनातून कोविड -19 लसीकरणासाठी आवश्यक फोटो ओळखपत्रांच्या पूर्वनिश्चित यादीत UDID चा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात येत असून लवकरच त्या कोविन मंचावर वापरासाठी उपलब्ध होतील.

कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी संमत फोटो ओळखपत्र म्हणून UDID च्या वापराला देण्यात आलेल्या परवानगीबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. 

UDID चा नमुना खाली दर्शविला आहे:

संदर्भासाठी UDID चा नमुना


* * *

S.Tupe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1725117) Visitor Counter : 211