PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
04 JUN 2021 9:21PM by PIB Mumbai
- India reports 1.32 Lakh Daily New Cases in last 24 hours, maintaining continued trend in decreasing Daily New Cases
- 2,07,071 patients recovered during last 24 hours
- More daily Recoveries than Daily New Cases for 22 consecutive days
- On a sustained upward slope, National Recovery Rate further increases to 93.08%
- Weekly Positivity Rate currently at 7.27%
- Daily positivity rate at 6.38%, less than 10% for 11 consecutive days
- 22.41 crore Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
नवी दिल्ली/मुंबई, 4 जून 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
सक्रिय रुग्णसंख्या घसरणीचा उतरता कल कायम, देशातील सक्रिय रुग्णसंख्या घटून 16,35,993; गेल्या सलग 8 दिवसांपासून 2 लाखांच्या खाली आली असून, गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत 77,420 रुग्णांची घट झाली आहे.
देशात गेल्या 24 तासात दैनंदिन 1.32 नवीन रुग्णांची नोंद , दैनंदिन नवीन रुग्णसंख्येचा घसरणीचा कल कायम आहे.
देशभरात आतापर्यंत, 2.65 पेक्षा जास्त रुग्ण कोविड मधून बरे झाले. गेल्या 24 तासात 2,07,071 रुग्ण कोविडमुक्त झाले.
सलग 22 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. वाढीचा आलेख कायम ठेवत, रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून 93.08% इतका आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 7.27%, तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 6.38%, सलग 11 व्या दिवशी हा दर 10% च्या खाली राहिला.
कोविड चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ – आतापर्यंत एकूण 35.7 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत, लसीच्या 22.41 कोटी मात्रा देण्यात आल्या.
इतर अपडेट्स :
महाराष्ट्र अपडेट:
महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यासाठी 5 स्तरीय अनलॉक योजना तयार केली आहे. ही योजना बाधितांची साप्ताहिक संख्या तसेच संबंधित जिल्ह्यांमधील भरलेल्या ऑक्सिजन खाटांची संख्या यावर आधारित आहे. परंतु “सध्याची बंधने कायम राहतील. त्याबाबतचा अंतिम निर्णय या अनलॉक धोरणाला मंजुरी मिळाल्यानंतर घेतला जाईल” असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातून कोरोना संसर्ग अजून समूळ नष्ट झालेला नाही तसेच ग्रामीण भागात बाधितांचे प्रमाण अजूनही वाढत आहे असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. राज्य सरकारने कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेतील संसर्ग तसेच तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. केंद्र सरकारने केंद्रीय शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारने अंतिम परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेतला.
गोवा अपडेट:
गोव्यातील करोना बाधितांचे संख्या गुरुवारी नवीन 572 रुग्ण आढळल्यानंतर 1,57,847 वर पोचली आहे. दिवसभरात किमान 1,695 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले तर 17 जण संसर्गाला बळी पडले. संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या 1,45,437 तर संसर्गामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 2,710 वर पोचली. राज्यातील सध्याची अॅक्टिव रुग्णसंख्या 9,700 आहे.
IMPORTANT TWEETS
* * *
M.Chopade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724554)
Visitor Counter : 178