आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 लसीकरणविषयक अद्ययावत माहिती
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 24 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा प्रदान
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे 1.93 कोटी हून अधिक लसींच्या मात्रा उपलब्ध
Posted On:
04 JUN 2021 10:33AM by PIB Mumbai
देशभरातील लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसींच्या विनामूल्य मात्रा उपलब्ध करीत सहकार्य करत आहे. याव्यतिरिक्त, राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या मात्रांची थेट खरेदी सुलभ करण्यासाठी केंद्रे सरकार पूरक भूमिका बजावत आहे. लसीकरण हा चाचणी, मागोवा, उपचार आणि कोविड-19 योग्य वर्तनासह, या महामारीच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक रणनीतीचा अविभाज्य स्तंभ आहे.
कोविड -19 लसीकरणाच्या व्यापक आणि गतीमान तिसऱ्या टप्प्याच्या रणनीतीच्या अंमलबजावणीला दिनांक1 मे 2021 पासून प्रारंभ झाला आहे.
या धोरणानुसार, प्रत्येक महिन्यात केंद्रीय औषधी प्रयोगशाळेने मान्यता दिलेल्या (सीडीएल) कोणत्याही उत्पादकाच्या लसींच्या एकूण मात्रांपैकी 50% डोस केंद्र सरकारकडून खरेदी केले जातील आणि केंद्र सरकार पूर्वीप्रमाणे या लसींच्या मात्रा राज्य सरकारांना पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करुन देत आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य आणि थेट राज्य खरेदी या दोन्ही प्रकारांत 24 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा (24,21,29,250) दिल्या आहेत.
यापैकी वाया गेलेल्या मात्रांसहित एकूण 22,27,33,963 लसींच्या मात्रांचा वापर(आज सकाळी 8 वाजता उपलब्ध आकडेवारीनुसार) झाला आहे.
1.93 कोटींहून अधिक कोविड लसींच्या मात्रा (1, 93, 95, 287) अद्याप राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत.
***
Jaidevi PS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724316)
अभ्यागत कक्ष : 227
Read this releasein:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam