दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी रुग्णवाहिका : महाराष्ट्र पोस्टल सर्कल
मेल मोटर वाहनांचे रुग्णवाहिकांमध्ये रूपांतर; रुग्णवाहिका ऑक्सिजन सिलिंडरसह आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या सुविधांनी युक्त
कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे केल्या तैनात
Posted On:
04 JUN 2021 2:25PM by PIB Mumbai
मुंबई, 4 जून 2021
महामारीविरूद्ध लढण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नात, महाराष्ट्र पोस्टल सर्कलने, टपाल कर्मचार्यांच्या हितासाठी चार रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल, एच. सी. अग्रवाल यांनी दिनांक 1 जून 2021 रोजी मुंबईतील सर्कल ऑफिस, येथून रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखवून त्या रवाना केल्या.
या रुग्णवाहिका ऑक्सिजन सिलिंडरसह आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या सुविधांनी युक्त असून मेल मोटर सर्व्हिसेस, मुंबई यांनी मेल मोटर वाहनांचे रुग्णवाहिकांमध्ये रूपांतर करून त्या तयार केल्या आहेत. या रुग्णवाहिका चालविण्यासाठी तात्पुरता परवाना देखील मिळविण्यात आला आहे. टपाल विभागाच्या कुटुंबातील सदस्यांच्या हितासाठी या रुग्णवाहिका कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे तैनात केल्या आहेत.
पोस्टमास्टर जनरल (मेल्स आणि बीडी), गणेश व्ही. सावळेश्वरकर, वरिष्ठ व्यवस्थापक (जेएजी) एस.बी. जॉन व्ही. ल्यूक आणि उपव्यवस्थापक (एमएमएस) श्री. एम. बी.डापसे यावेळी उपस्थित होते.
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724374)
Visitor Counter : 135