महिला आणि बालविकास मंत्रालय

35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधे 701 वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून 3 लाखाहून अधिक महिलांना सहाय्य

Posted On: 22 MAY 2021 4:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मे 2021

वन स्टॉप सेंटर योजना (OSCs)महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे राबवली जाते. एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणाऱ्या या केंद्राद्वारे आतापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त महिलांना सहाय्य करण्यात आले आहे. ही योजना 1 एप्रिल 2015 पासून देशभरात राज्य आणि केन्द्र शासित प्रदेशांच्या माध्यमातून राबवली जात आहे. खाजगी तसेच सार्वजनिक जीवनात अत्याचाराला बळी पडलेल्या तसेच संकटग्रस्त असणाऱ्या महिलांना एकाच छताखाली तातडीने सुविधा उपलब्ध केल्या जातात. यात पोलिस, वैद्यकीय, कायदेशीर मदत आणि समुपदेशन या सुविधांचा समावेश आहे. अत्याचाराविरोधात लढण्यासाठी महिलांना मानसिक पाठिंबाही दिला जातो. आतापर्यंत 35 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधे 701 ओएससी कार्यरत आहेत.

सध्या कोविड महामारीमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत संकटग्रस्त किंवा अत्याचाराला बळी पडत असलेल्या महिला तातडीची मदत आणि सेवा मिळवण्यासाठी जवळच्या ओएससीला संपर्क करु शकतात. महिला आणि बालविकास मंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिव/प्रशासक आणि सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी/जिल्हा दंडाधिकारी यांना टाळेबंदीच्या काळातही ही सगळी केंद्र कार्यन्वित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कोविड19 विरोधात लढण्यासाठी सॅनिटायजर, साबण, मास्क इत्यादी आवश्यक सामुग्रीची या केंद्रांवर उपलब्धता आहे याची खातरजमा करण्याचीही सूचना केली आहे.

योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्रांच्या सुरळीत कामकाजासाठी नियुक्ती/भरती/तसेच कायदेशीर सल्ला/वैद्यकीय सहाय्य/मानसिक-सामाजिक समुपदेशन इत्यादींसाठी संस्था/व्यक्तींची निवड करणे ही संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. मंजूर आणि कार्यान्वित ओएससींचा राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार तपशील खालीलप्रमाणे आहेः

कार्यान्वित वन स्टॉप सेंटर

Sr. No.

Name of State / UT

Number of OSCs Functional

1.

Andaman and Nicobar (UT)

03

2.

Andhra Pradesh

13

3.

Arunachal Pradesh

24

4.

Assam

33

5.

Bihar

38

6.

Chandigarh (UT)

01

7.

Chhattisgarh

27

8.

Dadra and Nagar Haveli and Daman & Diu (UT)

02

9.

Delhi (UT)

11

10.

Goa

02

11.

Gujrat

33

12.

Haryana

22

13.

Himachal Pradesh

12

14.

Jammu & Kashmir (UT)

18

15.

Jharkhand

24

16.

Karnataka

30

17.

Kerala

14

18.

Lakshadweep (UT)

01

19.

Ladakh (UT)

01

20.

Maharashtra

37

21.

Madhya Pradesh

52

22.

Manipur

16

23.

Meghalaya

11

24.

Mizoram

08

25.

Nagaland

11

26.

Odisha

31

27.

Punjab

22

28.

Puducherry (UT)

04

29.

Rajasthan

33

30.

Sikkim

04

31.

Tamil Nadu

34

32.

Telangana

33

33.

Tripura

08

34.

Uttar Pradesh

75

35.

Uttarakhand

13

TOTAL

 

701

 

कार्यान्वित 701 वन स्टॉप सेंटरची राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशवार माहिती इथे उपलब्ध आहे: https://wcd.nic.in/schemes/one-stop-centre-scheme-1

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720873) Visitor Counter : 304