पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड-19 व्यवस्थापनाबाबत देशातल्या राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी संवाद साधणार

Posted On: 17 MAY 2021 7:29PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 मे रोजी सकाळी 11 वाजता राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड महामारी व्यवस्थापनाबाबतचे त्यांचे अनुभव जाणून घेणार आहेत. यापैकी अनेक जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णात मोठी वाढ आणि व्यापक संसर्ग आढळला आहे.

विविध राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये, फिल्ड स्तरावरचे अधिकारी  कोविड-19 विरोधातल्या लढ्याचे नेतृत्व करत आहेत. यातल्या अनेकांनी मोठा पुढाकार घेत कल्पक तोडगेही सुचवले आहेत. अशा उपक्रमांना उत्तम प्रशंसा लाभल्यास प्रभावी प्रतिसाद आराखडा, लक्ष्यकेन्द्री धोरणाची अंमलबजावणी आणि आवश्यक धोरण विषयक सहाय्य विकसित करण्यासाठी मदत होणार आहे. 

संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपायांपासून ते दुसऱ्या  लाटेला तोंड देण्यासाठी आरोग्य सुविधा सज्ज राखण्यापर्यंत तसेच  आरोग्य सेवा क्षेत्रात मनुष्य बळाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि पुरवठा साखळीसाठी लॉजिस्टिक सुरळीत राहण्यासाठी या जिल्ह्यांनी, विविध प्रभावी उपाययोजना राबवल्या, परिस्थिती व्यवस्थापनासाठीच्या त्यांच्या अथक प्रयत्नात त्यांच्या यशोगाथाही आहेत, ज्या देशभरात उपयोगात आणल्या जाऊ शकतात.  

माननीय पंतप्रधानांसमवेत होणाऱ्या संवाद दरम्यान हे अधिकारी काही उत्तम उपाय कथन करतील त्याच बरोबर कोविड-19 विरोधातला लढा विशेषकरून निम शहरी आणि ग्रामीण भागात जारी ठेवण्यासाठी सूचना आणि शिफारसीही करतील.

उद्याच्या बैठकीत कर्नाटक, बिहार, आसाम, चंदीगड, तामिळनाडू, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश आणि  दिल्लीचे अधिकारी सहभागी होणार आहेत.

***

MC/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1719493) Visitor Counter : 221