पंतप्रधान कार्यालय
प्राध्यापक एम. एस. नरसिंहन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना
Posted On:
16 MAY 2021 7:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2021
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी प्राध्यापक एम. एस. नरसिंहन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
“प्राध्यापक रमेश नरसिंहन एक असामान्य गणितज्ञ म्हणून कायम ओळखले जातील.
त्यांनी या क्षेत्रात जागतिक पातळीवर उल्लेखनीय छाप सोडली आहे. गणिताशिवाय देखील त्यांनी अनेक विशेष कार्य करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचे कुटुंबिय आणि आणि मित्रांप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करतो. ॐ शांति”, असे आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे.
R.Aghor/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1719175)
अभ्यागत कक्ष : 212
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam