आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची संख्या 18 कोटींहून जास्त


देशभरात आतापर्यंत 18 ते 44 वर्षे वयोगटातील 42 लाखांहून जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण

गेल्या पाच दिवसांत चौथ्यांदा 24 तासांतील रोगमुक्तांची संख्या नव्या कोविड बाधितांपेक्षा अधिक

गेल्या 24 तासांत सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत 31,091 ची घसरण

कोविड-19 आजारावरील उपचारासाठी परदेशातून येणाऱ्या मदत सामग्रीला तातडीने मंजुरी देऊन त्याचे योग्य विभाजन करून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविण्याची प्रक्रिया सुरु

Posted On: 15 MAY 2021 11:22AM by PIB Mumbai

 

देशातील लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत एकूण 18 कोटींहून जास्त नागरिकांनी कोविड -19 प्रतिबंधक लस घेतली आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीच्या अंतरिम अहवालानुसार, देशात एकूण 26,02,435 सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून कोविड लसीच्या 18,04,57,579 मात्रा दिल्या गेल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेतलेले 96,27,650 आरोग्य सेवा कर्मचारी तर लसीची दुसरी मात्रा घेतलेले 66,22,040 आरोग्य सेवा कर्मचारी, 1,43,65,871 पहिल्या फळीतील कर्मचारी (पहिली मात्रा), 81,49,613 पहिल्या फळीतील  कर्मचारी (दुसरी मात्रा), 18 ते 45 वर्षे वयोगटातील 42,58,756 (पहिली मात्रा), 45 ते 60 वर्षे या वयोगटातील 5,68,05,772 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 87,56,313 लाभार्थी (दुसरी मात्रा) 60 वर्षांहून जास्त वयाचे 5,43,17,646 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 1,75,53,918 लाभार्थी (दुसरी मात्रा) तसेच यांचा समावेश आहे.

आतापर्यंत दिल्या गेलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांपैकी 66.73% मात्रा देशातील दहा राज्यांमध्ये दिल्या गेल्या आहेत.

 


गेल्या 24 तासांत 18 ते 44 वर्षे वयोगटातील 3,28,216  लाभार्थ्यांनी कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतली आहे आणि लसीकरण मोहिमेच्या सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 42,58,756  लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाची आतापर्यंतची एकूण आकडेवारी खालील तक्त्यात दिली आहे.

गेल्या 24 तासांत कोविड प्रतिबंधक लसीच्या 11 लाखांहून जास्त मात्रा देण्यात आल्या. लसीकरण मोहिमेच्या 119 व्या दिवशी, (14 मे 2021 रोजी) कोविड प्रतिबंधक लसीच्या  11,03,625 मात्रा देण्यात आल्या. एकूण 11,628 लसीकरण सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून  6,29,445 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 4,74,180 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

भारतात कोविडमधून बरे झालेल्यांची एकूण  संख्या आज 2,04,32,898 पर्यंत पोहोचली आहे तर राष्ट्रीय रोगमुक्ती दर 83.83% आहे.

गेल्या 24 तासांत 3,53,299 रुग्ण कोविडमधून बरे झाले अशी नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसात चौथ्यांदा भारतातील रोगमुक्तांची संख्या दैनंदिन कोविड बाधितांपेक्षा जास्त आढळून आली आहे.

कोविड आजारातून नव्याने बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी 70.49%  रुग्ण देशाच्या 10 राज्यांमधील आहेत.

 


 

भारतातील एकूण कोविड सक्रीय रुग्णसंख्या आज 36,73,802 ने कमी झाली आहे. आता हे प्रमाण देशात  आतापर्यंत सापडलेल्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 15.07% इतके झाले आहे.

गेल्या 24 तासांत, देशातील एकूण कोविड सक्रीय रुग्णसंख्या 31,091 ने कमी झाली.

भारतात नोंद झालेल्या एकूण सक्रीय रुग्णांपैकी 77.26% रुग्ण देशाच्या 11 राज्यांतील आहेत.


गेल्या 24 तासांच्या कालावधीत देशाच्या विविध राज्यांतील सक्रीय रुग्णांच्या संख्येत झालेल्या बदलाला खालील आलेखात अधोरेखित केले आहे.


गेल्या 15 दिवसांच्या काळात, विविध राज्यांतील सक्रीय रुग्णांच्या संख्येत झालेला बदल खालील आलेखात दर्शविला आहे.


कोविड-19 आजारावरील उपचारासाठी परदेशातून पाठविण्यात आलेल्या सामानाला सीमा शुल्क विभागाची तातडीने परवानगी देऊन योग्य विभाजनासह हे सामान राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत एकूण 10,796  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 12,269  ऑक्सिजन सिलेंडर्स, 19  ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 6,497  व्हेन्टिलेटर्स/बाय पॅप यंत्रे, रेमडेसिवीर औषधाच्या 4.2 लाखांहून जास्त  कुप्या हे सामान रस्ते तसेच हवाई वाहतुकीच्या माध्यमातून रवाना झाले आहे किंवा त्याचे वितरण झाले आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 3,26,098 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
देशातील नव्याने नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी 74.85%  देशाच्या दहा राज्यांमधील आहेत.
कर्नाटकात  दैनंदिन पातळीवर सर्वात जास्त म्हणजे 41,779 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. त्यापाठोपाठ, महाराष्ट्रात  एका दिवसात 39,923 आणि केरळमध्ये 34,694 नवे रुग्ण सापडले.

राष्ट्रीय मृत्युदर सध्या तो 1.09% आहे.
गेल्या 24 तासांत, कोविडमुळे  देशात 3,890 रुग्णांचा मृत्यू झाला.
यापैकी 72.19% रुग्ण देशाच्या दहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 695 कोविड ग्रस्तांचा मृत्यू झाला, तर त्यापाठोपाठ कर्नाटकात एका दिवसात 373 रुग्ण मृत्युमुखी पडले.


 


****

ST/SC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718782) Visitor Counter : 231