PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
13 MAY 2021 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 13 मे 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
कोविड परिस्थितीच्या व्यवस्थापनासाठी तसेच देशांतर्गत वैद्यकीय यंत्रणा बळकट राहावी याकरता जगभरातून येत असलेल्या मदतीचे तत्पर आणि सुविहित वाटप केन्द्र सरकार, राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना करत आहे.
एकूण, 9,284 ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर्स; 7,033 ऑक्सीजन सिलेंडर्स; 19 ऑक्सीजन जनरेशन प्लांट्स; 5,933 व्हेंटिलेटर्स/ बाय पीएपी आणि 3.44 लाखांपेक्षा जास्त रेडमडीसीवीर वायल्स आदी साहित्य रस्ते आणि हवाई मार्गे आतापर्यंत पाठवले आहेत.
दुसरीकडे, आतापर्यंत देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत 17.72 कोटींपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या आहेत. सध्या लसीकरणाचा देशव्यापी तिसरा टप्पा सुरु आहे.
ताज्या अहवालानुसार आज सकाळी सात वाजेपर्यंत कोविड 19 प्रतिबंधक लशींच्या एकूण 17,72,14,256 मात्रा, 25,70,537 सत्रांमधून देण्यात आल्या आहेत. यात 96,00,420 आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी ज्यांनी पहिली मात्रा घेतली आहे आणि 65,70,062 आरोग्य क्षेत्रात कार्यरत कर्मचारी ज्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे, 1,42,34,793 आघाडीवर कार्यरत कर्मचारी ( पहिली मात्रा), 80,30,007 आघाडीवर कार्यरत कर्मचारी (दुसरी मात्रा), 34,80,618 लाभार्थी जे 18-45 वयोगटातील आहेत (पहिली मात्रा), तर 45 ते 60 वयोगटातील 5,62,43,308 (पहिली मात्रा) आणि 81,58,535 (दुसरी मात्रा). तसेच 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 5,40,99,241 लाभार्थींना पहिली मात्रा आणि 1,67,97,272 लाभार्थींना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.
देशामधील दहा राज्यात एकूण लशींपैकी 66.73% मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 18-44 वयोगटातील 4,31,285 लाभार्थ्यांना कोविड-19 प्रतिबंधक लसाची पहिली मात्रा देण्यात आली. तर आतापर्यंत तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरण मोहिमेत 18ते 44 वयोगटातील एकूण 34,80,618 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. यात 30 राज्ये/ केन्द्र शासित प्रदेशांचा समावेश आहे.
गेल्या 24 तासात सुमारे 19 लाख लशींच्या मात्रा देण्यात आल्या. लसीकरणाच्या-117 व्या दिवशी (12 मे, 2021), 18,94,991 लशीच्या मात्रा देण्यात आल्या. 17,684 सत्रांमध्ये, 9,98,409 लशीची पहिली मात्रा आणि 8,96,582 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली
दिनांक: 12 मे,2021 (दिवस-117)
देशभरात एकूण 1,97,34,823 जण आज कोरोनामुक्त झाले. राष्ट्रीय कोरोनामुक्ती दर 83.26% वर पोहचला आहे.
गेल्या 24 तासात 3,52,181 जण कोरोनामुक्त झाले. कोरानामुक्त झालेल्या नवीन प्रकरणांपैकी 72.90% प्रकरणे, दहा राज्यामधील आहेत.
भारतातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या आज 37,10,525 वर पोहचली आहे. यात आता देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 15.65% प्रकरणांचा समावेश आहे. देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 79.67% रुग्ण हे 12 राज्यांमधे आहेत.
गेल्या 24 तासात 3,62,727 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात दहा राज्यांमधे 72.42% नव्या रुग्णांची नोंद झाली.
महाराष्ट्रात सर्वाधिक 46,781 दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली त्यानंतर केरळ 43,529 तर कनार्टकात 39,998 नवे रुग्ण आढळले.
राष्ट्रीय मृत्यूदर 1.09% वर कायम आहे गेल्या 24 तासात 4,120 मृत्यूंची नोंद झाली. दहा राज्यांमधे 74.30% नवे मृत्यू झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक (816). कर्नाटकात 516 दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली.
इतर अपडेट्स :
महाराष्ट्र अपडेट्स :-
महाराष्ट्र सरकारने सध्या राज्यात लागू असलेले कोविड संबधित प्रतिबंधात्मक निर्बंध 1 जून 2021 च्या सकाळी 7 वाजे पर्यंत वाढवले आहेत. राज्य सरकारने राज्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी त्यांचा RT-PCR अहवाल नकारात्मक असणे अनिवार्य केले आहे. राज्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांनी प्रवेशाआधी 48 तास या निदानाचा अहवाल काढलेला असला पाहिजे.
लसींच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठीची लसीकरण मोहिम तात्पुरती स्थगित केली आहे. या वयोगटासाठी खरेदी केलेले सर्व डोस 45 वर्षांवरील वयोगटातील लोकांना देण्यासाठी वापरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे असे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गोवा अपडेट्स:-
राज्यात प्रवेशासाठी नकारात्मक कोविड-19 अहवाल अनिवार्य करावा या उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे कडक पालन होत असल्याची खात्री करून घेण्यासाठी गोवा पोलिसांनी राज्यातील सीमांवरील गस्त वाढवली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करणारा करार केल्यानंतर गोवा सरकारने खाजगी रुग्णालये व प्राथमिक उपचार केंद्रांवरील ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
Jaydevi PS/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718451)
Visitor Counter : 222