आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड परिस्थितीच्या व्यवस्थापनासाठी आलेल्या जागतिक मदतीचे सर्व राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना केन्द्र सरकारकडून तत्पर वितरण


देशातील लसीकरणाने पार केला 17.72 कोटींचा टप्पा पार.

18-44 वयोगटातील 34.8 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांचे आतापर्यंत लसीकरण.

Posted On: 13 MAY 2021 11:53AM by PIB Mumbai

कोविड परिस्थितीच्या व्यवस्थापनासाठी तसेच देशांतर्गत वैदयकीय यंत्रणा बळकट राहावी याकरता जगभरातून येत असलेल्या मदतीचे तत्पर आणि सुविहित वाटप केन्द्र सरकार, राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना करत आहे.

 

एकूण, 9,284 ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर्स; 7,033 ऑक्सीजन सिलेंडर्स; 19 ऑक्सीजन जनरेशन प्लांट्स; 5,933 व्हेंटिलेटर्स/ बाय पीएपी   आणि  3.44 लाखांपेक्षा जास्त रेडमडीसीवीर वायल्स आदी साहित्य  रस्ते आणि हवाई मार्गे आतापर्यंत पाठवले आहेत.

 

दुसरीकडे, आतापर्यंत देशभरात

 

 कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत  17.72 कोटींपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या आहेत. सध्या लसीकरणाचा देशव्यापी तिसरा टप्पा सुरु आहे.

ताज्या अहवालानुसार आज सकाळी सात वाजेपर्यंत कोविड 19 प्रतिबंधक लशींच्या एकूण 17,72,14,256 मात्रा, 25,70,537 सत्रांमधून देण्यात आल्या आहेत. यात 96,00,420 आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी ज्यांनी पहिली मात्रा घेतली आहे आणि  65,70,062 आरोग्य क्षेत्रात कार्यरत कर्मचारी ज्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे, 1,42,34,793 आघाडीवर कार्यरत कर्मचारी ( पहिली मात्रा), 80,30,007 आघाडीवर कार्यरत कर्मचारी (दुसरी मात्रा), 34,80,618 लाभार्थी जे  18-45 वयोगटातील आहेत (पहिली मात्रा), तर 45 ते 60 वयोगटातील 5,62,43,308 (पहिली मात्रा) आणि  81,58,535 (दुसरी मात्रा). तसेच 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 5,40,99,241 लाभार्थींना पहिली मात्रा आणि 1,67,97,272 लाभार्थींना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

 

देशामधील दहा राज्यात एकूण लशींपैकी

 

 66.73% मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 18-44 वयोगटातील

 

4,31,285 लाभार्थ्यांना कोविड-19 प्रतिबंधक लसाची पहिली मात्रा देण्यात आली. तर आतापर्यंत तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरण मोहिमेत 18ते 44 वयोगटातील एकूण 34,80,618 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. यात 30 राज्ये/ केन्द्र शासित प्रदेशांचा समावेश आहे.

18 ते 44 वयोगटाच्या एकूण लसीकरणाची आकडेवारी खालील तक्त्यात दर्शवली आहे.

गेल्या 24 तासात सुमारे 19 लाख लशींच्या मात्रा देण्यात आल्या.

लसीकरणाच्या-117 व्या दिवशी (12 मे, 2021), 18,94,991 लशीच्या मात्रा देण्यात आल्या. 17,684 सत्रांमध्ये, 9,98,409 लशीची पहिली मात्रा आणि 8,96,582 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली

दिनांक: 12 मे,2021 (दिवस-117)

देशभरात एकूण 1,97,34,823 जण आज कोरोनामुक्त झाले. राष्ट्रीय कोरोनामुक्ती दर 83.26% वर पोहचला आहे.

गेल्या 24 तासात 3,52,181 जण कोरोनामुक्त झाले.

कोरानामुक्त झालेल्या नवीन प्रकरणांपैकी  72.90% प्रकरणे, दहा राज्यामधील आहेत.

कोरोनामुक्तीबाबत दर आठवड्याला सुधारणा होत असलेल्या प्रकरणांची दैनंदिन सरासरी खालील आलेखात दाखवली आहे.

भारतातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या

आज 37,10,525 वर पोहचली आहे. यात आता देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी  15.65% प्रकरणांचा समावेश आहे.

देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 79.67% रुग्ण हे 12 राज्यांमधे आहेत.

 देशातील दैनंदिन चाचण्या आणि दैनंदिन सक्रीय रुग्ण सापडण्याचा दर खालील आलेखात दाखवला आहे.

नवे रुग्ण सापडण्याचा दर 10% आणि 20% पेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांची राज्यवार माहिती खालील आलेखात दाखवली आहे.

 गेल्या 24 तासात 3,62,727  नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात दहा राज्यांमधे

72.42% नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्रात सर्वाधिक 46,781 दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली त्यानंतर केरळ 43,529 तर कनार्टकात 39,998 नवे रुग्ण आढळले.

राष्ट्रीय मृत्यूदर 1.09% वर कायम आहे

गेल्या 24 तासात 4,120 मृत्यूंची नोंद झाली.

दहा राज्यांमधे 74.30% नवे मृत्यू झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक (816). कर्नाटकात 516 दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली.

****

Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718249) Visitor Counter : 230