आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 महामारीच्या काळात अर्धा कोटी हून अधिक रुग्णांनी राष्ट्रीय टेलीमेडीसीन सेवेचा (ई-संजीवनी) लाभ घेतला आहे
दररोज 1500 पेक्षा अधिक डॉक्टर ई-संजीवनी या टेलीमेडीसीन मंचावरुन दूरस्थपणे रुग्णांना सेवा देत आहेत
काही राज्यांतून एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून गृह विलगी करणात असलेल्या कोविड-19 बाधीत रूग्णांना दूरस्थपणे तपासून,विशेष बाह्य रूग्ण सेवा देण्याच्या दिशेने कार्य सुरू झाले आहे
Posted On:
13 MAY 2021 3:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2021
सुमारे एका वर्षाहून, अतिशय कमी कालावधीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (एमएचएफडब्ल्यूच्या) नॅशनल टेलीमेडिसिन सर्व्हिस ( ई-संजीवनी) या वैशिष्ट्यपूर्ण सेवेद्वारे 50 लाखांपेक्षाही अधिक (अर्ध्या कोटींपेक्षा जास्त) रुग्णांना सेवा दिली आहे. एप्रिल 2020 मध्ये, पहिल्या टाळेबंदीच्या दरम्यान ज्यावेळी देशातील बाह्य रुग्ण सेवा बंद केल्या गेल्या होत्या, त्यावेळी केंद्रीय मंत्रालयाने टेलीमेडीसीन सेवेद्वारे रूग्ण ते डॉक्टर अशी दूरस्थ सल्ला देणारी सेवा सुरू केली होती . ई-संजीवनी हा उपक्रम देशातील 31 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे आणि देशभरात दररोज सुमारे 40,000 रूग्ण या संपर्कविरहित आणि जोखीम-मुक्त आरोग्यसेवापद्धतीचा लाभ घेत आहेत.
ई-संजीवनीची दोन मॉड्यूल आहेतः
ई संजीवनी एबी -एचडब्ल्यूसी - डॉक्टर टू डॉक्टर टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म- यात केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशातील सर्व आरोग्य आणि स्वास्थ्यकेंद्रांवर, हे हब आणि स्पोक मॉडेल राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 18000 हून अधिक आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रे आणि 1500 हून अधिक केंद्रांवर ई-संजीवनी एबी-एचडब्ल्यूसी कार्यरत करण्यात आली आहे आणि डिसेंबर 2022 पर्यंत 1,55,000 आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रांवर टेलिमेडिसिन सेवा कार्यरत होईल. ई-संजीवनी एबी-एचडब्ल्यूसी ही डिजिटल पध्दत नोव्हेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आली आणि या माध्यमाद्वारे 22 राज्यांतील जवळपास 20 लाख रूग्णांना डॉक्टर आणि तज्ञांकडून आरोग्य सेवा मिळाली आहे.
नॅशनल टेलिमेडिसिन सर्व्हिसचे दुसरे मॉड्यूल म्हणजे ई-संजीवनी ओपीडी: हे 28 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात उपयोगात आणले गेले आहे. ई संजीवनी ओपीडी वर एकूण 350 हून अधिक बाह्य रूग्ण सेवा स्थापित केल्या आहेत, त्यापैकी 300 पेक्षा अधिक विशेष बाह्य रूग्ण सेवा आहेत. 30,00,000 पेक्षा जास्त रूग्णांना नि: शुल्क सेवा ई -संजीवनी ओपीडीच्या माध्यमातून सेवा मिळालेली आहे.
डिजिटल आरोग्यसेवेच्या या स्वरुपामुळे नागरिकांना त्यांच्या घरातच आरोग्य सेवा पोचविणे शक्य झाले आहे.
सध्याच्या काळात आरोग्य सेवांवर ताण आलेला असताना ई संजीवनी देशाच्या आरोग्य सेवा वितरण प्रणालीचा समांतर प्रवाह म्हणून काम करत आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये या सेवेचा आरंभ करताना ई-हेल्थच्या या अनुप्रयोगाच्या द्वारे, ई-संजीवनी या सेवेद्वारे कोविड व्यतिरिक्त, इतर आजारांसाठी प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करता येईल अशी संकल्पना मांडली गेली होती.
काही राज्यांतून खास गृह विलगीकरण, बाह्य रूग्ण सेवा देण्याच्या दिशेने काम करीत आहेत, ज्यात रुग्णांची कोविड-19 साठी दूरस्थ तपासणी एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांद्वारे करण्यात यावी, अशा उद्देशाने विचार केला जात आहे. ई-संजीवनी द्वारे सल्लामसलत नोंदविणारे तमिळनाडू हे पहिले राज्य आहे,असूऩ तब्बल 10 लाख नागरीकांनी याचा लाभ घेतला आहे. संरक्षण मंत्रालयानेही यात पुढाकार घेतला असून , निवडक राज्यांतील लोकांपर्यंत सैन्यदलातील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे ही सेवा देण्यासाठी कार्य सुरू केले आहे.
मोहालीतील सी-डॅक केंद्रात, ईसंजीवनीचे निर्माते इ-संजीवनी ओपीडीमध्ये आणखी एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य जोडण्याच्या दिशेने कार्य करीत आहेत, जेणेकरून राष्ट्रीय बाह्य रूग्ण सेवा ईसंजीवनी ओपीडीवर आणता येईल. या नॅशनल ओपीडीज मुळे अनेक डॉक्टर देशातील कोणत्याही भागातील रूग्णांना दूरस्थ आरोग्य सेवा सहजपणे देऊ शकतील.
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718289)
Visitor Counter : 303