रेल्वे मंत्रालय

ऑक्सिजन एक्सस्प्रेसद्वारे देशभरात 7115 मेट्रीक टनाहून जास्त द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा


तामिळनाडूसाठी 80 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजन नेणारी पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस आज रात्री पोहोचेल

राष्ट्रीय राजधानी परिसरात (NCR) ऑक्सिजन एक्सस्प्रेसमधून आतापर्यंत 3900 मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजन उतरवला

डेहराडूनहून निघालेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसकडून पंजाबला 40 मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजन

ऑक्सिजन एक्स्प्रेसकडून दररोज जवळपास 800 मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजनचा देशभरात पुरवठा

ऑक्सिजनचा साठा घेऊन धावणाऱ्या ऑक्सिजन एक्स्प्रेस उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरयाणा, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली व उत्तर प्रदेशमध्ये दाखल

आतापर्यंत महाराष्ट्रात 407 मेट्रीक टन, उत्तरप्रदेशात जवळपास 1960 मेट्रीक टन, मध्यप्रदेशात 361 मेट्रीक टन, हरयाणात 1135 मेट्रीक टन, तेलंगणात 188 मेट्रीक टन, राजस्थानात 72 मेट्रीक टन, कर्नाटकात 120 मेट्रीक टन तर दिल्लीत 2748 मेट्रीक टनाहून जास्त ऑक्सिजन उतरवण्यात आला

Posted On: 13 MAY 2021 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2021

सर्व अडचणींवर मात करत आणि नवे पर्याय शोधत भारतीय रेल्वे देशभरातील राज्यांना द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने देशभरातील विविध राज्यांना जवळपास 7115 मेट्रीक टन द्रवरुप ऑक्सिजन 444 पेक्षा जास्त टँकर्स मधून पुरवला आहे.

काल ऑक्सिजन एक्स्प्रेसने जवळपास 800 मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजन देशभरात पोहोचवला. 115  आतापर्यंत  ऑक्सिजन एक्स्प्रेसनी  विविध राज्यांना मदत पोचवण्यासाठी प्रवास केला आहे.

मदतीची विनंती करणाऱ्या राज्यांना शक्य तेवढ्या लवकरात लवकर द्रवरूप ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वे पूर्ण प्रयत्नशील आहे.

हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत महाराष्ट्रात 407 मेट्रीक टन, उत्तरप्रदेशात जवळपास 1960 मेट्रीक टन, मध्यप्रदेशात 361 मेट्रीक टन, हरयाणात 1135 मेट्रीक टन, तेलंगणात 188 मेट्रीक टन, राजस्थानात 72 मेट्रीक टन, कर्नाटकात 120 मेट्रीक टन तर दिल्लीत 2748 मेट्रीक टनाहून जास्त ऑक्सिजन उतरवण्यात आला आहे.

तामिळनाडूला जाणारी पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस 80 मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजन घेऊन दुर्गापूरहून निघाली आहे ती आज रात्री पोहोचेल. 

ऑक्सिजन एक्सस्प्रेसनी आतापर्यंत राष्ट्रीय राजधानी परिसरात (NCR) वितरणासाठी आतापर्यंत 3900 मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजन पोचवला आहे.

ऑक्सिजनची अशी नवीन प्रकारे होणारी वाहतूक ही सातत्याने होत असल्याने यासंबधीत आकडेवारी सतत अद्ययावत होत असते. येत्या काही दिवसांमध्ये आणखी ऑक्सिजन घेऊन अधिकाधिक ऑक्सिजन एक्स्प्रेस त्यांच्या रात्रीच्या प्रवासाला सुरुवात करतील.

 

 

S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718360) Visitor Counter : 261